प्रतिष्ठित नागरिकांकडून “डॉक्टर्स डे” निमित्त डॉ. राजीव थोरात यांचा सत्कार

कराड:- सामान्य कुटुंबातूतील तसेच जिल्हा परिषदेच्या खेड्यातील शाळेत शिकलेले डॉ. राजीव थोरात यांनी आपल्या मातीतीलच ग्रामीण भागातील लोकांना सेवा देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. समाजातील अनेक गोरगरीब रुग्णांना कमी खर्चात उपचार देण्याचे काम गणेश हॉस्पिटलचे डॉ. राजीव थोरात यांनी केले असल्याचे गौरवोद्गार कराड बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील यांनी काढले.
कराड शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी गणेश हॉस्पिटलचे डॉ. राजीव थोरात यांना “डॉक्टर्स डे” निमित्त शुभेच्छा देवून त्यांचा सत्कार प्रसंगी प्रकाश पाटील बोलत होते. यावेळी अशोकराव पाटील -पोतलेकर, कराड वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी संदीप सूर्यवंशी, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब शिंगण, माजी नगरसेवक हणमंतराव पवार, टॅक्स कन्सल्टन्स विकास पाटील, दत्ताभाऊ गणेशकर, विशाल पाटील यांच्यासह हॉस्पिटल मधील कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
दादासो शिंगण म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर हे रुग्णांचे जीव वाचवून सामाजिक काम करत असतात. डॉ. राजीव थोरात अनेकदा ग्रामीण भागातील रुग्णांचा विचार करून त्यांना मदत करतात. रुग्णांवर उपचार करण्यासोबत त्यांना कमी खर्चात सेवा देण्याचे काम यापुढेही गणेश हॉस्पिटलच्या माध्यमातून होईल, असा विश्वास असल्याचे सांगितले.