जिल्ह्यातील दोघांकडून कराड पोलिसांच्या हद्दीतील चोरीच्या 6 दुचाकी जप्त
कराड | कराड शहर डीबी पथकाची धडाकेबाज कामगिरी दोन मोटर सायकल चोरांकडून 2 लाख 40 हजार रुपये किंमतीच्या 06 मोटर सायकल जप्त केल्या. या कारवाईत सातारा तालुक्यातील नागठाणे येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले असून जय अशोक सांळुखे आणि अषिश बन्सीराम साळुंखे (दोघेही रा. नागठाणे) अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस उप निरीक्षक आर. एल. डांगे व डीबी पथकाने गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून नागठाणे येथून दोघांना ताब्यात घेतले. त्यातील एकजण सातारा जिल्ह्यातील तडीपार व दुसरा सराईत दुचाकी चोर आहे. सदर कारवाईत आरोपी कडुन कराड शहर पोलीस ठाणेचे हद्दीतील विविध भागातून चोरी झालेल्या मोटर सायकल चोरीचे सहा गुन्हे उघड करण्यात आले आहेत. जय सांळुखे व अषिश साळुंखे या दोघांकडून एकुण 2,40,000/- रुपये किंमतीच्या एकुण 06 मोटर सायकल जप्त करण्यात आल्या आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, उपविभागीय पोलीस अधिकारी कराड अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, सफाै रघुवीर देसाई, सफाै संजय देवकुळे, पोलीस हवा. शशि काळे, पोलीस नाईक संतोष पाडळे, कुलदिप कोळी, पो.शि. महेश शिंदे, आनंदा जाधव, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, सोनाली पिसाळ यांनी केली.