कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची बदली

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी
महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस उपाधीक्षक व सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आलेल्या 143 पोलीस अधिकाऱ्यांच्याही बदली व पदोन्नती देण्यात आली आहे. यामध्ये कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांची बदली पोलीस उपाधीक्षक म्हणून कोल्हापूर येथे झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून बाळासाहेब यशवंत भालचिम तर पोलीस मुख्यालय सातारा येथे राजेंद्र धैर्यशील शेळके यांना पदोन्नती देण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील बदलीनंतर आता कराड शहर पोलीस ठाण्याचा पदभार कोणाच्या खांद्यावर पडणार हे मात्र, अद्याप जाहीर झाले नाही. परंतु सातारा पोलीस दलातील कोणाची कराड शहर पोलीस ठाण्यात वर्णी लागणार याकडे पोलीस दलाचे लक्ष लागून आहे.
जनमाणसात मिसळणारा अधिकारी म्हणून बी. आर. पाटील यांची ओळख
कराडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी कराड शहरात दोनवेळी सेवा बजावली. यामध्ये पहिली टर्म ही कुख्यात गुंड सलीम उर्फ सल्या चेप्या यांच्या काळातील होती. गुंडगिरी मोडून काढण्यात तसेच कराड शहरातील लोकांच्यात मिसळणारा पोलीस अधिकारी म्हणून बी. आर. पाटील यांची ओळख आहे. बी. आर. पाटील यांच्या दुसऱ्या टर्ममध्ये गुंडगिरीला आळा घालण्यात यश मिळाल्याचे पहायला मिळाले.