खेळताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

कराडच्या सानिका नलवडेला गोल्ड मेडल तर विशाल कांबिरे गोवा मॅरेथाॅनचा उपविजेता

DYSP अमोल ठाकूर यांच्या हस्ते सत्कार

कराड | महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी क्रॉसकंट्री स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवणारी खेळाडू सानिका नलवडे आणि गोवा येथील मॅरेथॉन स्पर्धेतील उपविजेता विशाल कांबिरे यांचा सत्कार कराडचे DYSP अमोल ठाकुर आणि युवा उद्योजक सुनील बामने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सूर्या स्पोर्ट्स ट्रस्टचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी विजय लिगाडे, डॉ. राहुल फासे, संदीप पाटील, जॉर्ज थॉमस, अर्जुन भिंगारे, डॉ. चंद्रकांत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सूर्या स्पोर्ट्स ट्रस्टची खेळाडू सानिका नलवडे हिने कॉसकंट्री मध्ये गोल्ड मेडल आणि 3000 मीटर ट्रॅकमध्येही गोल्ड मेडल मिळवले. दिनांक 05/11/2023 रोजी गोवा येथे झालेल्या मॅरेथाॅन स्पर्धेत विशाल कांबिरे याने द्वितीय क्रमांक मिळवला. त्याने 1 तास 08 मिनिट यावेळेत मॅरेथाॅन स्पर्धा पूर्ण केली.

कराडचे पोलिस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर म्हणाले, स्पर्धेत जिंकणे, हारणे एक भाग आहे. परंतु, ती स्पर्धा पूर्ण करणे हे एक ध्येय असावे लागते. आज कराडच्या छ. शिवाजी स्टेडियमधून राज्य, देश पातळीवर खेळाडू चमकत आहेत, ही बाब काैतुकास्पद आहे. प्रत्येकाने जीवनात एक ध्येय असणे गरजेचे असते तसे खेळाडूंही प्रत्येक स्पर्धेत उतरताना एक ध्येय ठेवून उतरतात. ज्याच्याकडे ध्येय असते तेच यशस्वी होतात.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker