कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड

रेठरे बुद्रुक । येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याशी संलग्न असलेल्या कृष्णा कृषी परिषदेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पाटील यांची निवड करण्यात आली. याबद्दल कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
कृष्णा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील शेतीला उर्जितावस्था आणण्यासाठी आणि शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उत्पादनवाढीला चालना देण्यासाठी कृष्णा कृषी परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. या परिषदेच्या माध्यमातून सातत्याने ऊसविकास मेळाव्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोफत सल्ला व मार्गदर्शन दिले जाते. परिषदेच्या नूतन अध्यक्षपदी गजेंद्र पाटील (आटके) यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या हस्ते श्री. पाटील यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कृषी परिषदेचे संचालक धनाजीराव पाटील, धोंडिराम कदम, जयवंत नांगरे, सुजीत मोरे, ब्रिजराज मोहिते, कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दिपक पाटील, कार्यकारी संचालक सी. एन. देशपांडे, व्यवस्थापकीय संचालक राम पाटील, मनोज पाटील, वैभव जाखले, आटकेच्या सरपंच रोहिणी पाटील, अरविंद पाटील, डॉ. राजेंद्र पाटील आदींसह मान्यवर उपस्थित होते.