कराड तालुक्यातील नवोदयला 6 तर शिष्यवृत्तीत 21 विद्यार्थी : दक्षिण तांबवेची शाळा अव्वल

कराड | तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी नवोदय आणि शिष्यवृत्ती परिक्षेत यश मिळवले त्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कराड तालुक्यातून नवोदयसाठी सहाजण तर शिष्यवृत्तीधारक 21 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये तांबवे केंद्रातील दक्षिण तांबवे जिल्हा परिषद शाळेचे सर्वात जास्त विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक आहेत. या विद्यार्थ्यांना मनिषा आबासो साठे यांनी मार्गदर्शन केले.
नवोदय यशस्वी विद्यार्थी नांव व जिल्हा परिषद शाळेचे नाव पुढीलप्रमाणे
अक्षद सचिन यादव (कासारशिरंबे, रिया योगेश अंबवडे (जखिनवाडी), निषाद श्रीराम रणसिंग (किरपे) हर्षित सुहास जगधनी (सावंतमळा), वेदांत गणेश खताळ (शिरगाव), सई प्रमोद थोरात (कोर्टी).
शिष्यवृत्तीधारक यशस्वी विद्यार्थी नांव व जिल्हा परिषद शाळेचे नाव पुढीलप्रमाणे
श्रीजीत विजय कुत्ते, विशाखा चंद्रकांत साठे, जान्हवी श्रीमंत पाटील, हर्षवर्धन विजय बाबर (सर्व चारही विद्यार्थी- दक्षिण तांबवे शाळा), साई प्रमोद थोरात, अनुष्का बजरंग थोरात, रुद्र सुनील थोरात (तिघेही विद्यार्थी- कोर्टी शाळा), सिद्धी अमोल कोचरे, आदित्य रवींद्र काळभोर (दोन्ही विद्यार्थी- पाल शाळा), अर्णव अमोल खंडाळे (पेंबर), जय महेंद्र जाधव (साजूर), वरदराज सचिन सुतार, प्रज्वल प्रमोद सावंत (दोन्ही विद्यार्थी- मसूर), श्रेय शिवाजी घोलप (वाघेश्वर), पृथ्वी संजय माने (तुळसण), जान्हवी राहुल जगदाळे (खुबी), रिया योगेश आंबवडे (जखिणवाडी), निषाद श्रीराम रणसिंग (किरपे), अक्षद सचिन यादव (कासारशिरंबे), अनिकेत पुरुषोत्तम पवार, आकांक्षा सुधाकर चव्हाण (दोन्ही विद्यार्थी- वाघेश्वर).
कराड तालुका पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी जि.प. सदस्य उदयसिंह पाटील, प्रदीप पाटील, उत्तम पाटील, कराड पंचायत समिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे, प्रमुख वक्ते युवराज पाटील, कराड पंचायत समिती गटशिक्षण अधिकारी सन्मति देशमाने, शिक्षण विस्तार अधिकारी मुलाणी मॅडम आणि रमेश कांबळे सर्व केंद्रप्रमुख तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक बँकेचे संचालक आदी उपस्थित होते.