कराड तालुका वृत्तपत्र विक्रेता संघटनेची कार्यकारिणी जाहीर

कराड :- येथील कराड तालुका वृत्तपञ विक्रेता संघटनेची कार्यकारिणी स्व.यशवंतरावजी चव्हाण सभागृहामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जाहिर करण्यात आली. अध्यक्षपदी जावेद काझी तर उपाध्यक्षपदी महादेव गिरीगोसावी यांची एकमताने निवड करण्यात आली.
कार्यकारिणीमध्ये सचिवपदी धनंजय पोतदार, सह सचिवपदी गणेश देसाई, संजय माळी तर खजिनदारपदी विश्वेश्वर मुळे, सहखजिनदार अनिल पालेकर, विश्वस्त सल्लागार गौतम काटरे, ज्येष्ठ मार्गदर्शक – गिरीश वैद्य, सन्माननीय सदस्य गिरीश धोत्रे, धर्मेंद्र पाटील, नागेश कोपर्डेकर, सारंग कत्ते, गणेश माळी, प्रवेश कोलपे, जगन्नाथ पवार यांचा नुतन कार्यकारिणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
याप्रसंगी वृत्तपञ विक्रेत्यांच्या भविष्य निर्वाह निधी, जीवन विमा तसेच संघटना बळकटीकरण आदी विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी शहर व तालुक्यातील वृत्तपञ विक्रेते बहुसंख्येने उपस्थित होते.