ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराजकियराज्यसातारा

कराडला 28 एप्रिल ते 3 मे शिवपुत्र संभाजी महानाट्य : डाॅ. अमोल कोल्हे

कराड | कृष्णाई क्रिएटीव्हज, कराड या समुहाच्या माध्यमातून जगदंब क्रिएशन निर्मित महेंद्र वसंतराव महाडिक दिग्दर्शित व डॉ. अमोल कोल्हे, प्राजक्ता गायकवाड, अजय तपकिरे, महेश कोकाटे याच्यासह 250 हून अधिक दिग्गज कलाकाराच्या कलेतून साकारलेले व शिवपुत्र संभाजी महाराजाच्या पराक्रम आणि ख्याती सांगणारे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य कराड येथील कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे दि. 28 एप्रिल ते 3 मे 2023 या कालावधीत रोज सायंकाळी 6 वाजता सादर होणार आहे. अशी माहिती दिग्दर्शित महेंद्र महाडिक व अभिनेते डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.

Shivputra Sambhaji Mahanatya:

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वासू पाटील (वसंतगड) उपस्थित होते. अमोल कोल्हे म्हणाले, या दिमाखदार महानाट्यसाठी अंदाजे रोज सातारा जिल्हा कराड परिसरातील नाट्य रसिक व शिवप्रेमी उपस्थित राहणार आहेत. कराडमध्ये कल्याणी ग्राउंड बैल बाजार येथे या महानाट्याचे भव्य नियोजन केले आहे. महानाट्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजाचा गौरवशाली इतिहास कलाकार आपल्या कलेचे सादरीकरण 2 तास 30 मिनिटे करणार आहेत. महानाट्यमध्ये चित्त थरारक घोडे स्वारी, शानदार फटाक्याची आतिषबाजी, नवीन तीन मजली भव्य रंगमंच, चित्त थरारक युदध प्रात्याक्षिके याचे थेट सादरीकरण केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी पहिले 2 दिवस 20 टक्के विशेष सवलत देण्यात आलेली आहे. तरी सर्वांनी संभाजी महाराजाचा धगधगता इतिहास जाणून घेण्यासाठी शिवपुत्र संभाजी महाराज हे महानाट्य पहावे. असे आवाहन यावेळी अभिनेते डॉ. अमोल कोल्हे व महेंद्र महाडिक यांनी केले आहे. या महानाट्यासाठी 300, 500 आणि 1 हजार रूपये असे असणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker