देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजेंच्यात कराडच्या शिवाजी स्टेडियमवर रणजी- आयपीयएलवरून राजकीय टोलेबाजी
कराड | कराडच्या शिवाजी स्टेडियमवर भाजपाचे लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांनी कृष्णा कृषी आणि आैद्योगिक प्रदर्शानाचे आयोजन केले आहे. याठिकाणी बोलताना डाॅ. अतुल भोसले यांनी छ. शिवाजी स्टेडियमला निधी उपलब्ध करण्याची मागणी केली. त्यानंतर भाषणाला आलेले छ. उदयनराजे यांनी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात आयपीएल आणि रणजी क्रिकेट मॅचवरून टोलेबाजी रंगलेली पहायला मिळाली. या टोलेबाजीवरून मंत्रीपदाची लाॅटरी मिळावी, असा सूचक वक्तव्य उदयनराजेंकडून करण्यात आले. या सर्व प्रकारावर उपस्थितांनी खळखळून हसत दाद दिली.
कृष्णा उद्योग समुह आणि कृष्णा कृषी परिषद यांच्याकडून 17 ते 22 जानेवारी असे कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. त्यांचे उद्घाटन आज पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खा. छत्रपती उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, कृष्णा उद्योग समुहाचे प्रमुख डॉ. सुरेश भोसले, भाजप लोकसभा प्रभारी डॉ . अतुल भोसले, विनायक भोसले, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, आ. जयकुमार गोरे, रामकृष्ण वेताळ, मनोज घोरपडे, माजी आ. आनंदराव पाटील, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
खा. उदयनराजे भोसले म्हणाले, अतुल बाबांनी छत्रपती शिवाजी स्टेडियम बाबत केलेली सूचना अमंलात यावी. तेव्हा लवकरात लवकर स्टेडियमची सुधारणा व्हावी. याठिकाणी पहिली जी रणजी ट्राॅफी असेल, त्याचं कॅप्टन म्हणून उपमुख्यमंत्र्यांनी यावं. तुमच्या अध्यक्षतेखाली मॅच व्हावी. आता कितीही काही केलं तरी आम्ही तुमची मित्रमंडळी आहोत, तेव्हा त्या टीममध्ये आम्हांला घ्या. राखीव खेळाडूत (रिझर्व्ह) ठेवू नका. मी सांगतो टीममध्ये कोणाला घ्यायचं आणि घ्यायचं नाही. सध्या मी बोललो असलो तरी स्टेजवरील सगळे तज्ञ आहेत. तेव्हा या सगळ्यांना टीममध्ये घ्या असे शेवटी म्हणाले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, बोलता- बोलता उदयनराजे भोसले म्हणाले रणजीची टीम आहे, अन् मला बाहेर ठेवू नका. महाराज ही रणजीची नाही तर आयपीएलची टीम आहे. या आयपीएलच्या टीमचे मालक तुम्हीच आहात. त्यामुळे टीममध्ये कोणाला आत ठेवायचं आणि बाहेर ठेवायचं हे तुम्हांलाच ठेवायचं आहे. तेव्हा तुम्ही आम्हांला ठेवा म्हणजे झालं.
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आळंदीची बैलजोडी
देवेंद्र फडणवीस साहेबांनी बैलगाडी सुरू व्हाव्यात म्हणून मोठे प्रयत्न केले. त्यामुळे बैलगाडीतून साहेबांची मिरवणूक काढायची आहे. या नियोजनामुळे माझे 2- ठोके चुकले. पळणारा बैल तुम्ही साहेबांच्या गाडीसमोर लावला. या दरम्यान, चूकून काही झालं तर जय हिंद- जय महाराष्ट्र माझं व्हायला नको. त्यामुळे शांतेत बैलगाडी चालणारी खास आंळदीवरून आणण्यात आली. खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मुलगा बैलगाडी चालवत असतानाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवताना पहायला मिळाल्याचे भाजपा लोकसभा प्रभारी डाॅ. अतुल भोसले यांनी सांगितले.