कराडला यायला लागतंय… सोमवारी मराठा मोर्चात नक्की काय करायचं ते वाचा
कराड | मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून कराड तालुका मराठा क्रांती मोर्चा समितीकडून सोमवारी (दि. 30) रोजी लाखोंच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला येणाऱ्या मराठा बांधवांनी मोर्चासाठी असलेल्या आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आचारसंहितेत समितीकडून मोर्चाचे नियोजन करण्यात आले असून काय करावे, काय करू नये तसेच घोषणा कोणत्या असतील हेही सांगितले आहे. तसेच मोर्चात कोणीही पाणी वाटप किंवा खाऊ वाटप करू नये.
मराठा क्रांती मोर्चा कराड तालुका मोर्चासाठी आचारसंहिता
सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक 10 वाजता मोर्चा
1) क्रांतीसुर्य मनोज जरांगे – पाटील यांनी पुकारलेल्या आमरण उपोषणाला समर्थन म्हणून कराड येथे होणाऱ्या क्रांती मोर्चा मध्ये मोर्चा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत कोणीही अन्न आणि पाणी प्राशन करणार नाही.
2) मोर्चामध्ये सर्वात पुढे भगवा ध्वज राहील त्यानंतर मुले व स्त्रिया राहतील आणि सर्वात शेवटी पुरुष मंडळी राहतील याची दक्षता आणि अंमलबजावणी सर्वांनी करण्याची आहे.
3)आपण पुकारलेल्या मोर्चा मध्ये आंदोलनाला गालबोट लागेल अशी वर्तणूक कोणत्याही परिस्थितीत करू नये.
4) मराठा क्रांती मोर्चा ची शिस्त ही सर्व येणाऱ्या समाज बांधवांनी पाळण्याची आहे.
5) मोर्चात स्वयंशिस्त पाळून स्वयंसेवक व पोलिसांना सहकार्य करावे.
6)मोर्चात कोणत्याही जातीधर्माविरोधात, कोणत्याही राजकीय व्यक्ती आणि पक्ष विरोधी घोषणा देऊ नयेत, कोणी देणारही नाहीत याकडे लक्ष द्यावे.
7)मोर्चावेळी धक्काबुक्की न करता, गोंधळ न करता सहभागी व्हावे.
8)कोणत्याही प्रकारचे व्यसन न करता मोर्चात सहभागी व्हावे.
9)मोर्चाला येताना आणि जाताना कुणीही हुल्लडबाजी करू नये, अधिक वेगाने वाहने चालवू नयेत.
10)मोर्चात सहभागी होताना मौल्यवान वस्तू, दागिने आणू नयेत.
11) लहान मुलांची आणि वृध्द लोकांची काळजी घ्यावी.
मोर्चामध्ये फक्त खाली दिलेल्या घोषणाच द्याव्यात, त्या सोडून दुसऱ्या घोषणा देवू नये
#एक मराठा लाख मराठा
#आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे
#जारांगे-पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
#कोण म्हणतंय देत नाही घेतल्या शिवाय राहत नाही
#तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय
#५०% च्या आतील ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे
मोर्चा चा मार्ग
मोर्चाचा मार्ग ः- शिवतीर्थ दत्त चौक – चावडी चौक – जोतिबा मंदिर – आंबेडकर पुतळा – महात्मा फुले पुतळा – चर्च – हेड पोस्ट – बस स्टँड – शिवतीर्थ – तहसीलदार कचेरी
महत्वाची सूचना
चर्च ते हेड पोस्ट सायलेंट झोन असले कारणाने तिथे कोणतीही घोषणा देण्यात येणार नाही.
मनोज जरांगे- पाटील यांचा हा त्याग आपल्या समाजासाठी आहे. तरी या मोर्चाला सहकुटुंब सहपरिवार यावे असे आवाहन करण्यात आले आहे.