ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसातारा

कराडला शिवजयंती उत्सव 2023 चे आयोजन : विक्रम पावसकर

कराड | हिंदू एकता आंदोलन कराड यांच्यावतीने शिवजयंती उत्सव 2023 चे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 19 एप्रिल ते 23 एप्रिल या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती हिंदू एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी दिली. तर 9 एप्रिल रोजी गोरक्षकांचा मेळावा कराड येथे सातारा जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, उपविभागीय पोलीस अधीक्षक डाॅ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली आहे.

कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत हिंदू एकता आंदोलनचे प्रांताध्यक्ष विनायक पावसकर, संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत जिरंगे, उपाध्यक्ष रुपेश मुळे, कार्याध्यक्ष राहुल यादव, जिल्हा संघटक अजय पावसकर, कराड शहराध्यक्ष प्रकाश जाधव, पाटणचे तालुकाध्यक्ष तुषार उर्फ गणेश पाटील यांच्यासह जिल्ह्यातील विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी विक्रम पावसकर म्हणाले, सालाबाद प्रमाणे याही वर्षी कराड येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. यासाठी हिंदू एकता आंदोलन कडून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमास कराड शहरवासीय तसेच शिवप्रेमी यांनी उपस्थिती लावावी.

karad-shiv-jayanti-

शिवजयंती उत्सव 2023 कार्यक्रमांची रूपरेषा पुढीलप्रमाणे
बुधवार (दि. 19) एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता सिने अभिनेते व प्रखर हिंदुत्ववादी व्याख्येचे शरद पोक्षे यांचे हिंदुत्व व हिंदुराष्ट्र (स्वातंत्र्यवीर सावरकर) यांच्याविषयी कृष्णाबाई घाट येथे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार (दि. 21) सायंकाळी 6 वाजता हिंदू एकता आंदोलन कराड यांच्यावतीने चावडी चौक कराड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. शनिवारी (दि. 22) सकाळी 8 वाजता कराड शहरात तसेच तालुक्यात सर्व शिवजयंती मंडळाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. याच दिवशी दुपारी 4 वाजता कराड तालुक्यातील रणरागिणींची टू- व्हीलर रॅली शिवाजी हाैसिंग सोसायटी ते कृष्णाबाई घाट या मार्गावरती काढण्यात येईल.त्यानंतर रॅलीतील महिलांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती कृष्णाबाई घाट येथे करण्यात येणार आहे. तर रविवार (दि. 23) एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्रातील सर्वात मोठी ऐतिहासिक दरबार मिरवणूक कराड शहरातील पांढरीचा मारुती मंदिर- मंगळवार पेठ ते दत्त चौक या मार्गावरती काढण्यात येणार आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker