हनुमान म्हणाले, विधानसभेला शेपटीने अन् लोकसभेला गदेन बडवीन : रामदास फुटाणे
कराड | विशाल वामनराव पाटील
माजी आमदार व थोर साहित्यिक रामदास फुटाणे यांनी आपल्या खास शैलीत भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. कराड येथे माजी राज्य सहकार मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील- उंडाळकर यांच्या 85 जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात हनुमान चालीसा तसेच ‘व्हॅलेंटाईन डे’ वरील केंद्र सरकारच्या पत्राचा चांगलाच समाचार घेतला. धर्माचे राजकारण केल्याने जगातील देशाची काय अवस्था झाली याचेही त्यांनी विवेचन केले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील आणि रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर उपस्थित होते.
रामदास फुटाणे म्हणाले, जिथे- जिथे धर्माचे राजकारण झाले, त्या देशाचा सत्यानाश झाला. कर्नाटकात मतपेटीत मतदान करतान जय हनुमान म्हटले जात होते. त्यावर मारुतीराया भक्तांना म्हणाला, विधानसभेला शेपटीने बडविले, लोकसभेला नाव घेतल्यास गदेन बडवीन. अजित पवार व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांनाही टोला लगावला म्हणाले, गेल्या आठवड्यात गोसा मार्गे सगळे ईडीच्या मार्गाने गेले. परंतु लोकांनी वारकरी मार्गाने गेल्यास समाज एकसंध राहील.
बाई ऐवजी गाईला आलिंगण
व्हॅलेंटाईन डे विरोध करण्यासाठी केंद्र सरकारने गाईला आलिंगण घालण्याचे पत्रक काढले होते. त्यावरही रामदास फुटाणे यांनी चांगला समाचार घेतला म्हणाले, बाई ऐवजी गाईला आलिंगन द्यायला केंद्र सरकारने सांगितले. तेव्हा इतकी अंधभक्ती असू नये, असाही टोला भक्तांना लगावला.