सातारा जिह्यातून तिघे 2 वर्षासाठी हद्दपार

सातारा | शहरात गर्दी मारामारी, दुखापत, शिवीगाळ, दमदाटी, जबरी चोरी, घरात घुसून दुखापत करणे आदी गुन्हे दाखल असणाऱ्या साैरभ उर्फ लाल्या नितीन सपकाळ (वय- 23, रा. रघुनाथपुरा पेठ, करंजे सातारा), ओंकार रमेश इंगवले (वय- 27, रा. देशमुख काॅलनी, करंजे पेठ, सातारा), मंदार हणमंत चांदणे (वय- 32, रा. गुरुवार पेठ, सातारा) तिघांना पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, या तिघांवर प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यामध्ये कसलीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी या तिघांवर असलेल्या गुन्ह्यांचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर अधीक्षकांनी या तिघांनाही सातारा जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले.
सरकार पक्षाच्या वतीने अपर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर, पोलिस उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलिस नाइक प्रमोद सावंत, केतन शिंदे, अनुराधा सणस यांनी योग्य पुरावे सादर केल्याने संशयितांवर कारवाई झाली.