अभियांत्रिकी क्षेत्रात इंग्रजी आणि सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व जाणून घ्या : अमृता चव्हाण

कराड | फ्लुएन्स स्पोकन इंग्लिश अँड सॉफ्ट स्किल्स इन्स्टिट्यूट, कराड यांनी डॉ. दौलतराव आहेर अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड आयोजित “अभियांत्रिकी क्षेत्रातील इंग्रजी आणि सॉफ्ट स्किल्सचे महत्त्व” या विषयावर संवादात्मक सत्र घेतले. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि विविध प्रकारच्या ॲक्टिविटीद्वारे त्यांच्याशी जोडले जाणे, हा सुंदर अनुभव होता, असे फ्ल्यूएन्स स्पोकन इंग्लिश अँड सॉफ्ट स्किल्सच्या संचालिका अमृता सुनिल चव्हाण यांनी सांगितले.
या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध मनोरंजनात्मक ऍक्टिव्हिटीज राबवण्यात आल्या. या सत्राचे आयोजन फ्लुएन्सच्या प्रशिक्षण विभाग प्रमुख रेश्मा महाडिक आणि समुपदेशन विभाग सहाय्यक स्वालेहा आत्तार यांनी केले होते. “हे अतिशय छान आणि मूल्यवर्धित सत्र होते,”असे विद्यार्थ्यांनी सांगितले. सदर सत्रास प्राचार्य डॉ. मुल्ला सर, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी श्री. बनसोडे सर, यांत्रिकी विभाग प्रमुख आणि विद्यार्थी उपस्थित होते.
सूत्रसंचालन रुपाली काटकर यांनी केले. विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढवण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल सर्वांचे टीम फ्ल्युएन्स तर्फे आभार मानण्यात आले. फ्ल्यूएन्स स्पोकन इंग्लिश अॅंड साफ्ट स्किलची अधिक माहितीसाठी 8623034830 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.