कोरेगावचा आमदार गब्बरसिंग जिल्हा लुटायला निघाला : आ. शशिकांत शिंदे
सातारा | आमदार महेश शिंदे मला शोले मधला अन्सारी बोलत असतील तर ते शोले मधले गब्बर आहेत. जे रोज गाव लुटायला यायचा हे जिल्हा लुटायचा प्रयत्न करतात. फिल्मी स्टाईलने आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार महेश शिंदे यांच्या टीकेला फिल्मी स्टाईलने प्रत्युत्तर दिले. कोरेगाव तालुक्यात सध्या शोले चित्रपटावरून चांगलीच राजकीय फटकेबाजी पहायला मिळत आहे.
विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांचे नेतृत्वाखाली जिल्हा परिषद येथे कोरेगाव तालुक्यातील रामोशीवाडीच्या पाणी प्रश्नावर मोर्चा काढून सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांची भेट घेण्यात आली. रामोशी वाडीतील पाणीटंचाईच्या प्रश्नावर योग्य मार्ग काढून रामोशी वाडी गाव टँकर मुक्त करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आल्याची माहिती आ. शशिकांत शिंदे यांनी दिली.
राष्ट्रवादी पक्षातून कोणीही फुटणार – आ. शशिकांत शिंदे
विरोधी पक्ष नेते अजित पवार हे काही आमदारांसोबत भाजपमध्ये जाणार या चर्चेबाबत आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी पक्षातून कोणीही आमदार फुटणार नसल्याचे स्पष्ट केले. अफवा वावड्या या कायमच उठत असतात. लवकरच 16 आमदार शंभर टक्के अपात्र ठरणार आहेत. त्यांना सहा वर्षासाठी आमदारकी लढवता येणार नाही. यामुळे सरकार अस्थिर होईल. तुमच्या धमक असेल तर लोकशाहीच्या मार्गाने निवडणुका लढवून दाखवा. दिल्लीतील यंत्रणेला देखील खात्री पटली की तुमच्यात खासदार निवडून येणार नाहीत. आमदारकी धोक्यात आहे. जनतेतून नाराजीचा सूर आहे. राष्ट्रपती लागवट अजून एक वर्ष पुढे निवडणूक असल्यामुळे लागू करता येईना. यामुळे सत्ताधाऱ्यांकडून सत्तेचा गैरवापर दिल्लीच्या, बिहारच्या मुख्यमंत्र्यांबाबत केला जातोय. तो प्रकार महाराष्ट्रात सुरू आहे. याचा उद्रेक पाहायला मिळेल, असे जोरदार हल्लाबोल आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजप आणि शिवसेनेवर केला.