ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यशैक्षणिकसातारा

कोटाच्या विद्यार्थ्यांची गगन भरारी : मॅथेमॅटिक्समध्ये तनया कुलकर्णी देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर चौथी

कराड | सायन्स ओलंपियाड फाउंडेशन ही संस्था सायन्स व गणित विषयांमध्ये शालेय विद्यार्थ्यांची आवड निर्माण व्हावी म्हणून गेली 25 वर्ष कार्य करत आहे. यासाठी ही संस्था इयत्ता 8 वी, 9 वी व 10 वी या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर सायन्स व मॅथेमॅटिक्स या विषयांची ओलंपियाड स्पर्धा आयोजित करते. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या या परीक्षेत कराड येथील कोटा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर मॅथेमॅटिक्स ओलंपियाडमध्ये घवघवीत यश प्राप्त केले आहे.

सायन्स ओलंपियाड नंतर नुकताच मॅथेमॅटिक्स ओलंपियाड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या इयत्ता नववी मधील तनया ऋषिकेश कुलकर्णी या विद्यार्थिनीने 60 पैकी 59 मार्क्स मिळवून देशात व आंतरराष्ट्रीय स्तरावर चतुर्थ क्रमांक पटकावला आहे. तसेच इयत्ता दहावी मधील वेदांतिका काकडे व विनय कारंडे या विद्यार्थ्यांनी 60 पैकी 58 मार्क्स मिळवून देशात सातवा व आंतरराष्ट्रीय स्तरावर आठवा क्रमांक पटकावला. त्याचबरोबर इयत्ता आठवी मधील आदित्य रामेश्वर पाटील ,ओम थोरात व प्राजक्ता तोरणे यांनी 60 पैकी 56 मार्क्स मिळवून देशांमध्ये 26 वा व आंतरराष्ट्रीय स्तरावर 36 वा क्रमांक पटकावला.

तसेच इयत्ता आठवी मधील सोळा विद्यार्थ्यांनी, इयत्ता नववी मधील चौदा विद्यार्थ्यांनी व इयत्ता दहावी मधील नऊ विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट मार्क मिळवून गोल्ड मेडल मिळविले आहे व ते विद्यार्थी दुसऱ्या राउंड साठी पात्र झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार कोटा अकॅडमीचे संचालक डॉ . महेश खुस्पे व संचालिका सौ. मंजिरी खुस्पे यांच्या हस्ते करण्यात आला. कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे यांनी विद्यार्थ्यांचे त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले. व विद्यार्थ्यांना प्रत्येकी रुपये 1000/- बक्षीस स्वरूपात देण्याचे घोषित केले. याप्रसंगी कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सच्या प्राचार्या जयश्री पवार, उपप्राचार्य सना संदे तसेच विद्यार्थ्यांना मॅथेमॅटिक्स ओलंपियाड करिता मार्गदर्शन करणाऱ्या कुमारी शीतल रामुगडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker