साताऱ्यात कोयता, सुरे घेवून फिरणाऱ्यास अटक : संशयित आरोपी ग्रामीण भागातला

सातारा | शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून बेकायदेशीर शस्त्र बळगणा-या व्यक्तीकडुन 1 कोयता, 2 सुरे, मोबाईल व मोटारसायकल असा 29,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विक्रम अशोक सांळुखे (वय- 24 वर्षे, रा. नेले, ता. जि. सातारा) असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीसांना एक लालरंगाचा टि शर्ट घातलेला इसम काळ्या रंगाचे हिरो पेंशन मोटरसायल वरून पांढरे रंगाचे पोत्यामध्ये धारदार शस्त्र घेवुन दत्तकृपा मोटर गॅरेजचे समोर मोळाचा ओढा येथुन जाणार आहे. सदर ठिकाणी गुन्हेप्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी सापळा रचून मोटर सायकलवरून येत असलेल्या व्यक्तिला थांबविले. विक्रम सांळुखे त्याच्या जवळील पांढऱ्या रंगाचे पोत्यात काय आहे असे विचारले असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. तेव्हा पोलिसांनी पांढरे रंगाचे पोते उघडून पाहीले असता, त्यामध्ये वेगवेगळया आकाराचा एक कोयता व दोन सुरे आढळून आले. संशयित विक्रम साळुंखे याला तब्यात घेवुन शाहुपुरी पोलीस ठाण्यात आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करणेत आलेला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोउपनि कृष्णा गुरव, पोहवा-सुरेश घोडके, पोना- मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, जोतिराम पवार, पोका- सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे, सुनिल भोसले यांनी केली आहे.