कराडचे स्व. यशवंतराव चव्हाण कृषि प्रदर्शन बुधवारी खुले राहणार

कराड | स्व. यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय 18 वे कृषि औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन प्रतिवर्षी प्रमाणे दिनांक 24 ते 28 नोव्हेंबर पर्यत होते. मात्र, शेतकरी,स्टॉल धारक यांचे आग्रहास्तव प्रदर्शन एकदिवसाने वाढवून बुधवार 29 पर्यत खुले राहणार असल्याची माहिती शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार कदम यांनी दिली.
आजपर्यंत प्रदर्शनास 7 ते 8 लाख लोकांनी भेट दिली असून रविवार व सोमवारी भेट देणाऱ्या शेतकरी, ग्राहक, विद्यार्थी भेटीने गर्दीचा उच्चांक झाला होता. मंगळवार एक दिवसच प्रदर्शनाचा उरला आहे. मात्र, प्रदर्शनाला मिळत असलेला प्रतिसाद पाहता आणि शेतकरी, स्टॉल धारक यांची मागणी विचारात घेऊन बुधवार दि 29 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तरी प्रदर्शनाचा लाभ शेतकरी, ग्राहक यांनी घ्यावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
प्रदर्शनात राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून शेतकरी बांधव हजेरी लावत असून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पीक, फुले तसेच अन्नधान्य यांची पाहणी आणि खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. आज श्वान पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती.