कृषीताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसातारा

बिबट्या मादी आणि बछड्यांचे पुर्नमिलन यशस्वी : जखिणवाडीतील व्हिडिओ पहा

कराड । जखिणवाडी येथे विहीरीत पडलेल्या बिबट्याच्या दोन्ही बछड्यांचे मादी बरोबर पूर्नमिलन करण्यात वनविभागला यश आले आहे. मध्यरात्री 1 वाजता बिबट्या मादीने आपल्या बछड्यांना येऊन आपल्यासोबत घेऊन गेली. कराड वनविभागाची सदर मोहीम यशस्वी झाली.

याबाबतची अधिक माहिती अशी, जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत शनिवारी सकाळी बिबट्याचे दोन बछडे पडल्याची घटना उघडकीस आली. विहीर मालक सुखदेव येडगे यांच्यासह ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी वनविभागाला तातडीने याची माहिती दिली. दरम्यान, विहिरीत पडलेले बिबट्याचे बछडे विहिरीत जीव वाचविण्यासाठी बराचवेळ धडपड करत होते. अखेर वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत लोखंडी पिंजऱ्याच्या मदतीने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बछड्यांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळवले होते. रविवारी सायंकाळी बिबट्या मादी तिच्या पिल्लांना परत घेण्यासाठी यावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात आले. पिल्लांना एका विशिष्ट पिंजऱ्यात ठेवण्यात आले व त्याचे दार तीन पूलीच्या सहायाने लांब बांधून ठेवण्यात आले. साधारणपणे पिंजऱ्या पासून पुली ओढणारे 150 फूट लांब अंतरावर 20 फूट उंचावर होते. पिंजरा शेजारी हालचाल टिपण्यासाठी विशिष्ट केमेरे लावण्यात आले. मादी साधारण रात्री 1 वाजता पिंजरा शेजारी घुटमुळू लागली हे कॅमेरामध्ये दिसले, त्या क्षणी पुलीच्या साहय्याने दोर ओढून पिंजरा दार उघडुन पिल्लांना मादी जवळ मुक्त करण्यात आले. यावेळी वनविभागाची बिबट्या मादी व बिछड्यांची पुर्नमिलनाची मोहिम यशस्वी झाले. दोन बिबट्या बछड्यापैकी एक मादी तर एक नर बछडा होता, त्याचे साधारण चार ते पाच महिन्याचे वय होते.

रेस्क्यू मोहिमेत कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, वनरक्षक कैलास सानप, सचिन खंडागळे, अरविंद जाधव, वाहन चालक योगेश बेडेकर, वनसेवक भरत पवार , अमोल माने, धनाजी गावडे, हनुमंत मिठारे, भाऊसो नलवडे, शशिकांत जाधव, प्राणीमित्र अजय महाडीक, उदित कांबळे, रोहीत कुलकर्णी, गणेश काळे तसेच रेस्कु पुणेचे हर्षद एजाज व पशसंवर्धन अधिकारी डॉ. ज्योती यांनी सहभाग घेतला होता.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker