होवू दे चर्चा… शिवसेनेचे सरकार विरोधात थेट भेट अभियान सुरू : हर्षद कदम
कराड | मुख्यमंत्री असताना कोरोना काळात उध्दव ठाकरे यांनी केलेलं काम आणि अन् आताच्या सरकारने गेल्या वर्षभरात भ्रष्टाचार, भूलथापा देत आहे. आज महाराष्ट्रातील वातावरण गढूळ आणि दूषित झालेलं आपण सर्वजण पाहतोय. या सर्वासोबत लेखाजोखा मांडण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाकडून होवू दे चर्चा… थेट भेट अभियान राबविणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिली.
कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा समन्वय इंद्रजित गुजर, शहरप्रमुख शशी करपे, युवा शहर प्रमुख अक्षय गवळी, शशिकांत हापसे, अजित पुरोहित यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी हर्षद कदम म्हणाले, कराड दक्षिण, उत्तर आणि पाटण मतदार संघात प्रत्येक बुथ प्रमुख 10 घरात जाणार असून पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. तसेच शिंदे, पवार आणि फडणवीस सरकारने लोकांचा कसा विश्वासघात झाला, यांची माहिती सामान्य माणसाला माहिती देणार आहेत.
आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नोव्हेंबर महिन्यात मेळावा
महाविकास आघाडी म्हणून ग्रामपंचायत निवडणूका सातारा जिल्ह्यात लढविण्यात येणार आहेत. पालकमंत्री शंभूराज देसाई दबावाचं राजकारण करत आहेत. मल्हारपेठ ग्रामपंचायतीत लोकप्रतिनिधी यांनी मदत न करताही आम्ही 5 ते 7 कोटींची विकासकामे केली आहे. पाटण मतदार संघात रस्ता कामात मोठा भ्रष्टाचार झाला असून योग्य वेळी मी कागदपत्रे घेऊन बोलेनं, असा इशारा हर्षद कदम यांनी दिला आहे. तसेच पुढील महिन्यात युवानेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.