आरोग्यताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनब्रेकिंगराज्यसातारासामाजिक

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लोकप्रतिनिधींच्या पत्राची आवश्यकता नाही :- रामहरी राऊत

ना वशिला, ना ओळख तरी संजीवन मेडिकल सेंटरमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळतोय

कराड :- मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळवण्यासाठी आता लोकप्रतिनिधी तसेच सिव्हिल सर्जन यांच्या कोणत्याही पत्राची आवश्यकता नसल्याची माहिती शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली आहे.

रामहरी राऊत यांनी संजीवन मेडिकल सेंटरला भेट देऊन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून आर्थिक मदत मिळाल्याबद्दल रूग्णांची विचारपूस केली. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळवण्यासाठी कोणताही वशिला, कोणतीही ओळख नसतानाही थेट मदत मिळते. मुख्यमंत्री सहायता निधी मिळवण्यासाठी 3 लाख 60 हजार रुपये पर्यंत तहसीलदार उत्पन्नाचा दाखल्याची मर्यादा वाढवण्यात आला. संजीवन मेडिकल सेंटरमध्ये अत्यंत स्वच्छता असून रूग्णांना समाधान देणारे हाॅस्पीटल असल्याचे गौरवोद्गार रामहरी राऊत यांनी काढले.

Sanjeevan Medical Center karad

कराड येथील संजीवन मेडिकल सेंटरला शिवसेनेच्या सहाय्यता मदत निधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी डॉ. विजयसिंह पाटील, डॉ. दिलीप सोळंकी, शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक गौरव गुळवणी, तासगाव कवठेमहाकाळ तालुकाप्रमुख सचिन शेटे, निलेश गुळवणी, डॉ. राजाराम पाटील, डॉ. भाग्यश्री पाटील, स्वप्निल साळुंखे आदी उपस्थित होते.

डॉ. विजयसिंह पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आमच्या संजीवन मेडिकल सेंटरमध्ये आतापर्यंत 190 रुग्णांना लाभ मिळाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी मिळाल्याने ग्रामीण भागातील रुग्णांना आर्थिक फायदा झाला असून त्यांच्या चेहऱ्यावर आम्हांला समाधान पाहायला मिळते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच त्यांच्या सर्व टीमचे असे मनःपूर्वक धन्यवाद मानतो. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया संजीवन मेडिकल सेंटर पूर्ण करते, त्याकरिता अन्य ठिकाणी जावे लागत नाही.

संजीवन मेडिकल सेंटरची सेवाभावी वृत्ती
संजीवन मेडिकल सेंटरने आत्तापर्यंत 190 रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ मिळवून दिला आहे. आत्तापर्यंत सव्वा कोटी रुपयांची मदत कराडसह ग्रामीण भागातील रुग्णांना मिळाली. डॉ. विजयसिंह पाटील यांच्या प्रामाणिक आणि सेवाभावी वृत्तीमुळे सातारा जिल्ह्यात कमी वेळेत जादा निधी मिळाला आहे. रुग्णांच्या सेवेकरता संजीवन मेडिकल सेंटरने आणखीन जोरदारपणे काम करावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे सर्वजण या हॉस्पिटलच्या पाठीशी राहो, अशी ग्वाही शिवसेना वैद्यकीय मदत कक्षप्रमुख रामहरी राऊत यांनी दिली.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker