बाजार समितीत महाविकास आघाडीची ‘सेंच्युरी’ : शिवसेनेची धुळधाण
हॅलो न्यूज | राज्यात बाजार समितीच्या निवडणुका सुरू असून गेल्या तीन दिवसापासून निवडणूक प्रक्रिया पार पडत आहेत. राज्यात 253 बाजार समितीसाठी मतदान पार पडत असून आतापर्यंत जवळपास 200 बाजार समितीचा निकाल लागला आहे. यामध्ये महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवत सेंच्युरी मारली आहे. तर भाजप- शिवसेना (शिंदे गटाला) यांना 54 जागांवर यश मिळाले. परंतु यामध्ये शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाची धुळधाण उडाली असल्याचे दिसत आहे.
राज्यात बाजार समितीच्या निवडणूक निकालात सर्वाधिक जागा काॅंग्रेस आणि भाजपाने 44 बाजार समितीमध्ये सत्ता मिळवली तर राष्ट्रवादीने 29 ठिकाणी यश मिळवले. महाविकास आघाडी म्हणून तीन्ही पक्षांनी एकत्रित येत 22 ठिकाणी सत्ता मिळवली. शिंदे गटाने 10 तर उध्दव ठाकरे गटाने अवघ्या 5 बाजार समितीवर सत्ता मिळवली आहे. शेकापने पक्षाने 5 ठिकाणी त्यासोबत इतरांनी 28 ठिकाणी यश मिळवले.
बाजार समितीच्या निवडणुकीतील निकाल हाती येत असून उद्या दि. 1 मे रोजी राज्यातील सर्व बाजार समितीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्यात कोणता पक्ष मोठा ठरणार याकडे राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्याचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडीने मारलेल्या सेच्युरींमुळे काॅंग्रेस, राष्ट्रवादी आणि उध्दव ठाकरे गटात आनंदाचे वातावरण असल्याचे पहायला मिळत आहे.