मंद्रुळकोळे जि. प. गटात वत्सला चॅरिटेबल ट्रस्टकडून 13 हजार वह्यांचे मोफत वाटप
कराड । विशाल वामनराव पाटील
कुटुंबाचा समाजसेवेचा वारसा जपत रमेश अण्णासाहेब पाटील व भगिनी सौ. भारतीताई पाटील यांच्या संकल्पनेतून आईंच्या नावे स्थापन केलेल्या वत्सला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून मंद्रुळकोळे जिल्हा परिषद गटातील सर्व 79 जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील 2020 विद्यार्थ्यांना 13,000 वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले.
ढेबेवाडी विभाग डोंगराळ दुर्गम विभाग आहे. येथील लोकांचा शेती व पशुपालन हा मुख्य उदरनिर्वाहाचा मार्ग अनेक ठिकाणी मुलांना शिक्षण देत असताना गोरगरीब पालकांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. जिल्हा परिषद परिषद प्राथमिक शाळेत पाठ्यपुस्तक शासनाकडून मोफत दिली जात असली, तरी वह्यांचे दर भरमसाठ वाढलेले पालकांना आर्थिक दृष्ट्या मोठा भुर्दंड पडत आहे. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून मोफत वह्या वाटप करण्याचा उपक्रम दरवर्षी राबवला जातो. त्यामुळे डोंगरदऱ्यातील पालकांना शैक्षणिक बाबतीत मदतीचा हात मिळत आहे. वह्या वाटप करण्यासाठी खास वह्या तयार केल्या असून त्यावर सुविचार व प्रबोधनात्मक संदेश देण्यात आलेले असून वह्या वाटप करण्यासाठी रमेश अण्णासाहेब पाटील जनसंपर्क कार्यालयाचे कार्यालय प्रमुख अण्णासाहेब काळे, शिवाजी पाटील, पोपटराव पाव्हणे, धनाजी जाधव आदी सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
आपल्या माणसासाठी केलेल्या कामामुळे समाधान
विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना लोकांच्या अडीअडचणी समजल्या, विकास कामाबरोबर व वत्सला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक सामाजिक, लोकोपयोगी उपक्रम राबवत असून आपल्या मातीतील माणसासाठी केलेल्या कामामुळे मनाला समाधान मिळत असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्य व वत्सला चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील यांनी सांगितले.