मराठ्याचं आरक्षण घालवलं आता आझाद मैदानावर बसावं : कुणी केला शरद पवारांवर गंभीर आरोप
सातारा | मराठा आरक्षणाबाबत महाराष्ट्रात राण पेटलेलं असताना सदाभाऊंनी थेट पवारांनाच आव्हान दिलय. पवारांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसावं आरक्षण प्रश्नावर आत्ता पवार मगरिचे अश्रू ढाळतायेत, असा आरोप करीत. मराठा समाजाच्या प्रस्तापित नेत्यांनीच मराठा समाजाची माती केलीय. 2004 साली बापट आयोग कोणी स्थापन केला. बापट आयोगानं आरक्षण देता येणार नाही, असं सांगितलं. तरी हा आयोग का स्विकारला, आघाडी सरकारच्या काळात पवारांनी मराठ्यांच आरक्षण घालवलं, असा गंभीर आरोप सुद्धा सदाभाऊ खोत यांनी केला आहे .
सातार येथे सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, 2018 साली गायकवाड आयोगाने अनेक पुरावे गोळा केले. त्या आधारे मराठा समाजाला आरक्षण मिळालं ते सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट यामध्ये टिकलं होतं. परंतु पवार साहेबांनी जाणीवपूर्वक मराठ्यांचे आरक्षण घालवलं, असा गंभीर आरोपही केला.
यावेळी सदाभाऊ खोत म्हणाले, आता देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीची, पवारांची सत्ता उलथून टाकली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जातीने ब्राह्मण असल्यामुळे शरद पवार मराठा आरक्षणाचा खापर ब्राह्मण जातीतील असलेल्या माणसाच्या दिशेने फोडत आहेत. तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात तुमचा इतिहास लिहिला जाईल. तेव्हा शरद पवार हे लढाऊ सेनापती नाही, तर पाठीत खंजीर खुपसणारे सेनापती म्हणून इतिहास लिहिला जाईल. त्यामुळे माझं आव्हान आहे, पवारांनी मराठ्यांच्या आरक्षणासाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसावं