मसूरची शितोळे वस्ती 25 वर्षानंतर उजळली : रामकृष्ण वेताळ यांचा पाठपुरावा
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
मसूरची 25 वर्षे विजेविना अंधारात चाचपडत पडलेली शितोळे वस्ती आज दीपावलीच्या पहिल्याच दिवशी उजेडात न्हाऊन निघाली. भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ यांच्या परिश्रमाला यश. विद्युत पुरवठा यंत्रणेचे भाजपतर्फे उद्घाटन करण्यात आले. खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाली. हा आनंद माझ्या जीवनात ऊर्जा देणारा ठरला. असे मत युवानेते रामकृष्ण वेताळ यांनी बोलताना व्यक्त केले.
यावेळी भाजपा सातारा जिल्हा सचिव दिपाली खोत,भाजपाचे ओबीसी तालुकाध्यक्ष सुनील दळवी, माजी उपसरपंच संजय शिरतोडे, भाजपा कराड उत्तर तालुका उपाध्यक्ष जयवंत जगदाळे, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष बिपिन जगदाळे, ग्रा.पं. सदस्या सौ.पूजा साळुंखे, हेळगावचे माजी उपसरपंच रवींद्र सूर्यवंशी, ॲड. उदय जगदाळे, नवीन जगदाळे, अतुल जगदाळे, चंद्रकांत कदम, नवनाथ बर्गे, रघुनाथ शेडगे, राजेंद्र रणशिंग, बापू लोहार, दत्ता माने, पिंटू मोरे, जयवंत निकम, अशोक निकम, गणेश लोहार, राजेंद्र बानुगडे, अरुण शिंदे , दिपक माने, निरंजन थोरात अभियंता बुंदेले, उपकार्यकारी अभियंता जाधव मॅडम, अभियंता नलवडे आदीं उपस्थित होते.
वेताळ म्हणाले एका महिन्याच्या आत हे काम आपण पूर्ण केले. आता या वस्तीला लवकरच दर्जेदार रस्ता देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. काही मंडळींनी येथे नारळ फोडायची तयारी केल्याचे समजले. पण दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय घेण्यापेक्षा स्वतः कामे करून आपली उंची वाढवावी. राज्यात व देशात कर्तव्यदक्ष सरकार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जनतेला लाईट पाणी व रस्ता देण्याचा विचार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून आपण तालुक्यात 20 कोटींचे रस्ते आणले. अनेक कामे चालू आहेत तर काही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. विद्यमान पंचवीस वर्षे आमदार होते. अडीच वर्षे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांनी कामे का केली नाहीत असा सवाल करून आम्ही केलेल्या कामांचा नारळ फोडून किंवा फलक लावून श्रेय घेऊ नये.
दिपाली खोत म्हणाल्या, या वस्तीवरील रहिवाशांचा लाईट पाहिजे अशी मागणी होती. इथे राहणाऱ्यांची लहान मुले मोठी होऊन त्यांची लग्ने होऊन नातवंडे खेळायला लागली तरीही लाईट आली नाही. युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या प्रस्ताव देण्यापासून ते या क्षणापर्यंतच्या अथक प्रयत्नाने एक महिन्याच्या आत लाईट सुरु झाली.
यावेळी संजय शिरतोडे, जयवंतराव जगदाळे, ॲड. उदय जगदाळे यांची भाषणे झाली. अक्षय बर्गे, असिफ मुजावर यांनी स्वागत केले. वामनराव शिरतोडे यांनी आभार मानले.
केवळ 10 मिनिटासाठी बेचैन…..
घरातील वीज दहा मिनिटे गेली तर आपण बेचैन होतो. इथे तर २०-२५ वर्षे उलटली तरीही लाईट नाही ही कल्पनाच वेदनादायी असून इथल्या नेतृत्वाला आजअखेर येथे लाईट देणे शक्य झाले नाही. पण श्रीमंत खा. उदयराजे सभोसले यांच्या सहकार्याने व युवा नेते रामकृष्ण वेताळ यांच्या अथक पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले.
ॲड. उदय जगदाळे