मंत्री शंभूराज देसाई छ. उदयनराजेंच्या वाड्यातून निघताना म्हणाले… मी चालत जातो (Video)

सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
छत्रपती उदयनराजे भोसले यांची आज एका खासगी कामानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट घेतली. या दोघांमधील मैत्री सर्वांना माहीती असून वारंवार भेटी होत असतात. परंतु, आजच्या चक्क भेटीनंतर राजे… मी चालत जातो असे पालकमंत्री शंभूराज देसाई म्हणाले. या भेटीचा व्हिडिअो व्हायरल होत असून मंत्री शंभूराज देसाई यांनी छ. उदयनराजेंना वाकून नमस्कार केल्याचेही दिसत आहे.
सातारा येथील जलमंदिर येथे छ. उदयनराजे यांची मंत्री श्री. देसाई यांनी भेट घेतली. या भेटीचे कारण खासगी असल्याने कळू शकले नाही. परंतु, भेटीनंतरचा घडलेला प्रकार आणि त्याचा व्हिडिअो समोर आल्याने चांगलाच व्हायरल होवू लागला आहे. यामध्ये दोघांमध्ये चेष्टा मस्करी पहायला मिळत असून उपस्थितांच्यात हश्या पिकला होता. तसेच मंत्री श्री. देसाई यांची चप्पल कुठे घेतली यांचा विषय चांगलांच रंगला होता.
मंत्री श्री. देसाई यांच्या घरातील स्मितादेवी देसाई यांच्याविषयी उपस्थितांमध्ये विषय निघाला होता. त्याचवेळी पुढे मंत्री श्री. देसाई यांनी छ. उदयनराजे यांची तक्रारवजा चेष्टा केलेली पहायला मिळत आहे. ते म्हणाले, आम्हांला वेळ नसतो छ. उदयनराजे हे आम्हांला काम लावतात. तेव्हा उदयनराजे यांनी मी गाडीचा दरवाजा उघडतो म्हणताच. मंत्री शंभूराज देसाई म्हणाले… मी चालत जातो.



