धरणग्रस्तांच्या बेमुदत ठिय्या आंदोलनास उद्या मंत्री शंभूराज देसाई भेट देणार
न्याय मागुन मिळत नसेल तर तोंडात मारून मिळवा ः रविंद्र शेलार
पाटण | डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखालील कोयनानगर येथे 27 फेब्रुवारी रोजी पासुन धरणग्रस्तांचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई हे उद्या (दि. 27) आंदोलनास भेट देणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्री काय भूमिका घेणार याकडे सर्व धरणग्रस्तांचे लक्ष लागले आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री शंभूराज देसाई यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्या सोबत फोनवर चर्चा करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. तसेच आपण 27 रोजी आंदोलन स्थळी भेट देऊन धरणग्रस्तांशी संवाद साधणार असल्याचे बोलले होते. त्यानुसार मंत्री शंभुराज देसाई सोमवारी जिल्हा दौ-यावर येत असून कोयनानगर येथे ठिय्या आंदोलन स्थळी भेट देणार आहेत. तसेच विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोयना धरण पुर्नवसनाच्या बाबत शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात येणार आहे. ना. देसाई धरणग्रस्तांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्याची शक्यता आहे. मात्र, धरणग्रस्त या बाबतीत निर्णय घेतील असे यापुर्वीच भारत पाटणकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या काही दिवसांत घडलेल्या सकारात्मक घडामोडींमुळे धरणग्रस्तांना आशेचा किरण दिसू लागला आहे. तालुक्याचे सुपुत्र असलेल्या पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक लागण्यासाठी पुढाकार घेऊन आमचे प्रश्न कायमचे निकाली काढावेत, अशी अपेक्षा धरणग्रस्त करत आहेत.
न्याय मागुन मिळेत नसेल तर तोंडात मारून मिळवा – रविंद्र शेलार
मनसेचे मानखुर्द विभाग प्रमुख रवींद्र शेलार यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन धरणग्रस्तांशी संवाद साधताना म्हणाले, आमच्या आजोबा, पणजोबांनी राष्ट्रहितासाठी धरणसाठी जमीनी दिल्या. तो गुन्हा होता का? 64 वर्षे झालीत. मात्र, धरणग्रस्तांना आजही आंदोलनास बसावे लागत आहे. डॉ. पाटणकर यांनी लढा उभारला आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई, विक्रमसिंह पाटणकर, पृथ्वीराज चव्हाण, श्रीनिवास पाटील, शंभुराज देसाई, आनंदराव पाटील यांच्या सारखे लोकप्रतिनिधी या तालुक्याने दिले. तुम्ही श्रमिक मुक्ती दलाच्या माध्यमातून लढा देत आहात. तोंड वाजवून न्याय मिळेत नसेल, तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, हे राजसाहेबांनी सांगितले आहे. पतंगराव कदम पुर्नवसन मंत्री असताना. त्यांनी सांगितले होते, कि कोयनेचा प्रश्न मिटवू. मात्र, तो मिटला नाही, धरणातून विस्थापित झालेली गावे किती, प्रत्येक गावातला एक एक तरुण या लढ्यात आणा, होळी, गुढ्या उभारून काही होणार नाही, आजार कुठे, आणी मलम कुठे आहे? भारत पाटणकर यांचे वय कामाचा आवाका, त्यांचा आभ्यास बघता ते हे काम करत आहेत. खासदारांनी घोषणा केल्याप्रमाणे विज बंद केली नाही, तुमचे आंदोलनाची चेष्टा सुरू आहे, आजून दहा पिढ्या गेल्या तरी यांच्या कडून काही होणार नाही. ज्यांना भरभरून मतदान केले. त्यांना जाब विचारू या, घेराव घालूया, काळे फासुया, असे केल्याशिवाय यांना कळणार नाही. यावेळी रविंद्र गवस, विशाल बोरगे, रोहित शेट्टी, युनुसभाई यांच्या सह मनसैनिक उपस्थित होते .