अल्पवयीन मुलांनी आखला 10 वीच्या मुलाचा खूनाचा कट
वाई तालुक्यातील घटनेमुळे पालकांच्यात घबराट
वाई | वाई येथील सिद्धनाथ वाडीतील आरोपीने आपल्या अल्पवयीन तीन साथीदारांच्या मदतीने वेळे येथील एकाचा खून करण्याचा केलेला कट आज पोलिसांनी मोठ्या शितापीने उघड आणला. या प्रकरणातील वेदांत मच्छिंद्र डोंगरे ( वय- 19 वर्षे रा. सिध्दनाथवाडी, वाई) व त्याचे 4 विधी संघर्ष साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दहावीचा 25 मार्च रोजीचा पेपर संपल्यानंतर कोयत्याने खून करण्याचा अखेर वाई पोलिसांनी उघडकीस आणला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वाईचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांना सुमारे 4 दिवसापुर्वी गोपनीय बातमीदरा मार्फत वाई शहरातीतल मुले वेळे येथील अल्पवयीन मुलाचा खून करणार असल्याची माहिती मिळाली. आहेत. त्यानंतर बातमीची शहानिशा करुन संशयीतांना सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचा-यांनी वाई शहरातून व वेळे गावातून संशयितांना ताब्यात घेतले. महीन्यापुर्वी एका अल्पवयीन मारले होते. याचा राग मनात धरुन 10 वीच्या परिक्षेचा शेवटचा पेपर संपल्यानंतर वेळे येथील अल्पवयीन मुलाला उचलून न्यायचे व कोयत्याने त्याच्यावर वार करुन त्याचा खुन करायचा असा कट रचला असल्याचे कबूल केले. सदरील गुन्ह्याचा पुढील तपास आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, श्रीमती शितल जानवे खराडे, उप विभागीय पोलीस अधिकारी वाई विभाग यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, आशिष कांबळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व गुन्हे प्रकटीकरण विभागाचे कर्मचारी विजय शिर्के, सोनाली माने, पो.कॉ. किरण निंबाळकर, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर, अमित गोळे यांनी सदरची कारवाई केली.