आमदार मनोजदादा घोरपडे यांनी सह्याद्रीचे रणशिंग फुंकले
माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना खुलं आव्हान

कोरेगाव :- सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात सभासदांना कवडीमोल किंमत देणाऱ्या चेअरमनाना आता सभासदच जागा दाखवून देतील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांचा पट काढणारच, असे खुले आव्हान कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी माजी आमदार बाळासाहेब पाटील यांना दिले आहे.
नागझरी (ता. कोरेगाव) येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमात आमदार मनोजदादा घोरपडे बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हा संयोजक सुनील तात्या काटकर, भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, माजी कृषी सभापती भीमराव पाटील, ज्येष्ठ नेते व्यंकटराव आप्पा नलावडे, ज्येष्ठ नेते शंकरराव भोसले पाटील, रहिमतपूर चे माजी नगराध्यक्ष संपतराव माने, पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रलेखाताई माने कदम, राष्ट्रवादी काँग्रेस चे राजेंद्र घाडगे, विकास अण्णा गायकवाड, माजी सरपंच आर .आर. फडतरे, विकास भोसले, उपसरपंच विश्वास भोसले अण्णासो भोसले, पै. सोमनाथ भोसले यांची व्यासपीठावर उपस्थित होती.
आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, सह्याद्री सहकारी साखर कारखान्यात विद्यमान सत्ताधाऱ्यांनी चालविलेला मनमानी कारभार संपविण्यासाठी सभासदांनी आता गावोगावी जोरदार मोहीम सुरू केली आहे ज्या पद्धतीने विधानसभेला जनतेने ही निवडणूक हातात घेतली तसेच कारखाना निवडणुकीमध्ये सुद्धा सभासद ही निवडणूक हातात घेऊन सर्वसामान्य घरातील संचालक व चेअरमन या कारखान्यावर राहातील.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साबळे यांनी केले , प्रास्ताविक विकास भोसले यांनी केले तर आभार सौ. रसिका भोसले यांनी मानले.
नागझरीला पाणी देणारच….
गेली ७० वर्षे होऊन अधिक काळ दुष्काळाच्या छायेत असलेल्या नागझरी गावाचा पाणी प्रश्न माजी आमदार असलेल्यांना निष्क्रिय लोकप्रतिनिधींना सोडवता आला नाही मात्र आता उरमोडी जलसिंचन योजनेतून अथवा टेंभू योजनेतून नागझरी गावाचा पाणी प्रश्न सोडवणारच असा विश्वास आमदार मनोज दादा घोरपडे यांनी या भव्य सत्कार समारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने ग्रामस्थांना दिला.



