खासदार छ. उदयनराजे भोसले यांच्या फंडातून पाटण तालुक्यासाठी 2 कोटी 20 लाखांचा निधी
सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
पाटण तालुक्यातील विकासकामांना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भरघोस निधी देत पाटण तालुक्यावर विशेष प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे. पाटण तालुक्यातील कार्यकर्त्यांना ताकद देणेसाठीच तालुक्यात विकास निधी दिली असल्याची माहिती भाजपा प्रदेश सचिव भरत पाटील, आंण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष पाटण विधानसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी दिली.
पाटण तालुक्यातील खालील गावांना निधी
गुढे सभा मंडप (10 लक्ष), बनपुरी नाईकबा नगर येथील स्मशानभूमी सुशोभीकरण करणे (5 लक्ष), तारळे येथे अंतर्गत गटार बांधणे (8 लक्ष), धनगरवाडी विठ्ठल मंदिर समोरील समाज मंदिर बांधणे (7 लक्ष), तळमावले येथील कुंभारगाव रोड लगत हायस्कूलकडे जाणारा रस्ता संरक्षक भिंत व रस्ता मुरमीकरण करणे (5 लक्ष), तळमावले येथे अंतर्गत गटार बांधकाम करणे (5 लक्ष), माजगाव येथील ग्रामपंचायत पुढील रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लक्ष, सडावाघापूर ते वनकुसवडे रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे (10 लक्ष), काठीटेक येथील पद्मावती माध्यमिक विद्यालय काठीटेक 2 शाळा खोल्या बांधणे (10 लक्ष), आंब्रग येथील ग्रामपंचायत इमारत बांधकाम करणे 10 लक्ष, मोरगिरी येथील ईदगाह मैदान वॉल कंपाउंड बांधणे 10 लक्ष, कोंजवडे येथे अंतर्गत गटार बांधकाम करणे 7 लक्ष, शिवंदेश्वर भराडेवस्ती सभागृह सुशोभीकरण करणे (5 लक्ष), हेळवाक मारुती मंदिर सभागृह बांधणे (5 लक्ष), मळे ( कोळणे,पाथरपुंज ) शिवकालीन मंदिर सभा मंडप बांधणे (10 लक्ष), ढेबेवाडी येथील बाजार तळाचे सुशोभीकरण करणे (10 लक्ष), केरळ येथील माऊली मंदिर ते जन्नेवाडी रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे 10 लक्ष, सुरुल येथील पाटण ते सुरुल रस्ता खुदाई व खडीकरण 5 लक्ष, पाटण येथे कब्रस्थान संरक्षण भिंत बांधणे (7 लक्ष), मल्हारपेठ (पवारआळी ) येथे स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता सुधारणा करणे (7 लक्ष), बहुले येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लक्ष), दिवशी बु.येथे केदार मंदिर जवळ सभामंडप बांधणे (7 लक्ष), कराटे येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लक्ष), गोषटवाडी येथे गावठाण अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लक्ष), महाडिकवाडी येथे सभामंडप बांधणे (7 लक्ष), केर येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे 7 लक्ष, काढणे येथे अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे (7 लक्ष), सरटेवाडी येथे सभामंडप करणे (8 लक्ष) अशी दोन कोटी 20 लाख रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.
यापुढील काळातजी पाटण तालुक्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून खासदार उदयनराजे भोसले यांचे माध्यमातून आणखी विकास निधी आणून तालुक्याला विकासाचे मॉडेल बनवणार असल्याची ग्वाही भरत पाटील नाना नरेंद्र पाटील साहेब, विक्रमबाबा पाटणकर यांनी दिली. पाटण तालुक्यातील भाजपा पदाधिकारी पाटण पूर्व अध्यक्ष नंदकुमार सुर्वे, पाटण पश्चिम अध्यक्ष गणेश यादव माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ लाहोटी, कविताताई कचरे,दीपक महाडिक फत्तेसिंह पाटणकर, धीरज कदम, रवि मिसाळ, नाना सावंत, संजय माने, चंद्रकांत भिसे, अनिल भोसले, रावसाहेब क्षीरसागर, अक्षय यादव, अशोक पाटील,गणेश खांडके, प्रविण उदूगडे, नितीन जाधव, अनिल माने सचिन देटके सोशल मीडिया जिल्हा संयोजक रविंद्र लाहोटी तसेच भाजपा कार्यकर्ते मतदार नागरिक यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब यांचे आभार मानले. पाटण तालुक्यातील विकास कामे मंजूर करणेसाठी लोकसभा संयोजक माजी शिक्षण सभापती सुनील काटकर तात्या यांनी प्रयत्न केले. त्यांचे पाटण तालुका भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचेकडून आभार व्यक्त करणेत आले.