चक्क : खासदार नितीन काकांचा अभिनंदनाचा बॅंनरच चोरीला
कराड ः- महायुतीकडून राज्यसभेवर खासदार म्हणून नितीन काका पाटील यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली आहे. सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी त्याच्या कार्यकर्त्यांकडून शुभेच्छा बॅंनर लावले आहेत. खासदार नितीन पाटील यांची निवड झाल्यानंतर नुकतेच कराड तालुक्यात येवून गेले. खासदारांच्या अभिनंदनाचे बॅंनर अनेक ठिकाणी लावलेले असताना सुपने (ता. कराड) येथे धनाजी पाटील यांनी लावलेल्या बॅंनरच रात्रीचा चोरीला गेला आहे.
कराड- पाटण मार्गावर असलेल्या सुपने गावच्या बसस्थानक परिसरात धनाजी पाटील यांनी खासदार नितीन पाटील यांच्या अभिनंदनाचा बॅंनर लावला होता. या बॅंनरवर खासदारांसह, उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार मकरंद पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे फोटो होते. अवघ्या 4-5 दिवसापूर्वी लावलेला बॅंनर चोरीला गेल्याने नक्की चोर कोण यांचा शोध धनाजी पाटील मित्र परिवारांकडून सुरू आहे. सदरील प्रकार राजकारणातून झाला असल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. महायुतीतून राष्ट्रवादीच्या नितीन काका यांना खासदारकीचे तिकिट देण्यात आले होते. महायुतीचे उमेदवार म्हणून ते बिनविरोध निवडूणही आलेले आहेत.
आम्ही खासदारांना आणि आ. मकरंद पाटील यांना मानणारे कार्यकर्ते असल्याने बॅंनर लावला होता. परंतु, गुरूवारी रात्रीचा बॅंनर चोरीला गेला आहे. शुक्रवारी सकाळी बसस्थानक परिसरातील बॅंनर चोरीला गेल्याचे समजल्याने मला धक्काच बसला. याबाबत आम्ही शोध घेत आहे. परंतु, बॅंनर न मिळल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्याची तयारी आम्ही ठेवली आहे.
श्री. धनाजी पाटील (सुपने, ता. कराड)