मुख्याधिकारी औंधकर 2 लाखांची लाच घेताना सापडले : कराडच्या मुख्याधिकाऱ्यांची नाशिकला बदली

कराड | कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी व सध्याचे विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांना तब्बल दोन लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात सापडले. तर सध्याचे कराड पालिकेचे मख्याधिकारी रमाकांत डाके यांची आजच नाशिक जिल्ह्यात बदली झाल्याचे आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आता नवे मुख्याधिकारी कोण याकडे कराडकरांचे लक्ष लागून आहे. परंतु आजच्या पालिके संदर्भातील या घडामोडीमुळे चर्चा रंगलेली दिसून आली.
कराड नगर परिषदेमध्ये 2015 ते 17 या दरम्यान मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले विनायका औंधकर हे लाचलुचपत खात्याच्या सापळ्यात अडकले. विटा शहरातील एका बांधकाम व्यावसायिकास परवान्यासाठी अडीच लाखांची मागणी करण्यात आली होती. परंतु अखेर 2 लाखांची लाच घेताना आज सायंकाळी लाचलुचपतला रंगेहात सापडले. मुख्याधिकारी म्हणून विनायक औंधकर यांनी कराड पालिकेत कार्यभार सांभाळला होता. तेव्हा शेवटचा काही काळ त्यांचा वादग्रस्त ठरला. त्यांच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलने केले. त्यांच्या बदलीच्या प्रसंगीही नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर त्यांची या ठिकाणाहून बदली झालीच. तेही थेट महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तपदी. त्यानंतर हा विषय कराडात चर्चेचा ठरला व तो आजही कायम आहे.
दरम्यान, कराड नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची बदली नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे रिक्त जागेवर झाल्याचे व त्या ठिकाणी उद्या हजर होण्याचे आदेश शासनाच्या संबंधित विभागाच्या वतीने काढण्यात आले आहेत.व तसा आदेश पारित झाला आहे. शासनाच्या आदेशात त्यांना चांदवड येथे उद्या हजर होण्याचे आदेशात म्हंटले आहे.
सोशल मिडियावर सध्या विटा नगरपरिषदेमध्ये तीन महिन्यापूर्वी बदली होवून आलेले मुख्याधिकारी विनायक आैंधकर यांना लाच घेताना अटक करण्यात आले. त्यानंतर नगरपरिषदेच्या बाहेर फटाक्याची अतिषबाजी करण्यात आली.