ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रब्रेकिंगराजकियराज्यसातारा

साताऱ्यात राष्ट्रवादी- शिवसेनेत राजकारण तापलं : वाशीतला गुंड 20 वर्षे फसवतोय

सातारा | सुप्रियाताई या खूप मोठ्या नेत्या आहेत, त्यांनी एवढ्या खालच्या लेवल बघणं म्हणजे त्यांचा पराभव आहे. ताईंनी गुंड, दहशतवादी यांचा विचार केला पाहिजे. आज ताईंनी आपण ज्यांना गाडी फिरवतात त्यांनी गोरगरीब सामान्य जनतेला किती लुटले आहे, याचा विचार केला पाहिजे. आज राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांच सरकार आहे. गुंडांना पायबंद घालायचा असेल तर कायदा वापरावा लागणार आहे. वाशीतला गुंड आणून गेली 20 वर्षे यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांना काळिमा फासण्याचे काम केल असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांच्यावर कोरेगाव मतदार संघाचे आमदार आ. महेश शिंदे यांनी केला आहे.

नलवडेवाडी- तळीये (ता. कोरेगाव) येथील रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रम प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. काही दिवसांपूर्वी आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्ताने अंबवडे- संमत वाघोली येथे स्वाभिमान सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार शशिकांत शिंदे व खासदार सुप्रिया सुळे यांनी आ. महेश शिंदे यांचा सभेमध्ये शाब्दिक समाचार घेतल्याने आमदार महेश शिंदे यांनी ही खरमरीत प्रतिक्रिया दिली. त्यामुळे पुन्हा एकदा कोरेगाव तालुक्यातील दोन्ही शिंदे आमदारांचे वाकयुद्ध कितपत पेटते हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

विकास कामतला धोंडा हुमगाव आणि वाशीच्या बांधावर टाकला
मुंबईची संस्कृती त्यांनी दाखवून दिली. कोरेगाव तालुक्याच्या विकास कामातला आणि सुसंस्कृतपणातला धोंडा होता. जो विकास कामात अडसर आणि वहिवाटीत अडथळा ठरत होता. कोरेगाव तालुक्यातील शेतकरी व सुज्ञ जनतेने 2019 साली वहिवाटीला अडचण ठरत असलेला दगड हुमगाव व वाशी येथील बांधावर नेऊन टाकला आहे. आता उचललेला दगड पुन्हा गरगळत येऊ शकत नाही, असा टोला आमदार महेश शिंदे यांनी लगावला. कोरेगाव मतदार संघातील मुलांना 3-3 लाख रूपये घेवून फसवले आहे. लाखो तरूणांचे पैसे खाल्ले आहेत. वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या जमीनवर घोटाळे केल्याचा आरोपही आ. शशिकांत शिंदेवर केला आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker