तारळे विकास सेवा सोसायटीत पालकमंत्र्यांना धक्का : राष्ट्रवादीची सत्ता अबाधित
पाटण | तारळे विकास सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी पाटणकर गटाने पुन्हा एकदा आपले वर्चस्व ठेवत विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या श्री नवलाई देवी शेतकरी विकास पॅनेलने 10 तर विरोधी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला अवघ्या 3 जागांवर समाधान मानावे लागले. या सोसायटी निवडणुकीसाठी 1341 सभासदांपैकी 1250 मतदारांनी हक्क बजावला. त्यापैकी 91 मते बाद ठरली.
सत्ताधारी गटाने माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर, खा. श्रीनिवास पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजित पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदाभाऊ जाधव यांच्या नेतृत्वात विजय मिळवला. सोसायटीच्या निवडणुकीत सर्वसाधारण गटात चुरस दिसून आली. सत्ताधाऱ्यांना 5 तर विरोधकांना 3 जागा मिळाल्या. मात्र इतर प्रवर्गात श्री. नवलाई देवी शेतकरी विकास पॅनेलने निर्विवादपणे वर्चस्व ठेवत विजय मिळवला.
विजयी उमेदवार व त्यांची मते (कंसात) सर्वसाधारण गटातून- अभिजीत जाधव (639), नवनाथ जाधव (607), नामदेव जाधव (606), सुभाष पवार (628), दत्तात्रय पाटील (628), तर विरोधी गटातून- श्रीधर जाधव (612), मारूती जाधव (589), राजेंद्र पवार (587) हे उमेदवार विजयी झाले आहेत. अनुसुचित जाती- जमाती प्रवर्गातून- राजेश आनंदराव जगधनी (692), भटक्या विमुक्त प्रवर्गातून- तानाजी दत्तू खरात (685), इतर मागास प्रवर्गातून- हणमंत दिनकर काटकर (704), महिला राखीव गटातून- मंगल तानाजी जाधव (661), उषा संजय टोळे (659)