सातारा जिल्ह्यात 10 ठिकाणी नवे पोलिस अधिकारी

सातारा। जिल्हा अंतर्गत पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्याचा आदेश पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी काढला असून १० ठिकाणी नविन प्रभारीची नेमणूक केली आहे. तसेच नविन ठिकाणी हजर होवून तात्काळ अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये कराड, फलटण, सातारा, खंडाळा तालुक्यातील पोलिस ठाण्यात नव्याने अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.
नव्याने हजर होणाऱ्या अधिकाऱ्यांची नांवे व ठिकाण पुढीलप्रमाणे – पोलिस निरीक्षक कोंडीराम नामदेव पाटील (प्रभारी, पोलीस उपअधीक्षक (मुख्या.) सातारा), पोलिस निरीक्षक हेमंतकुमार कुमारपाल शहा (प्रभारी, सातारा शहर पो. ठाणे), पोलिस निरीक्षक विजय तुकाराम पाटील (प्रभारी, अधिकारी कराड शहर पो. ठाणे), पोलिस निरीक्षक प्रदीप बाळासाहेब सुर्यवंशी (प्रभारी,अधिकारी कराड तालुका पो. ठाणे), पोलिस निरीक्षक धनंजय यशवंत फडतरे (प्रभारी, अधिकारी शाहुपुरी पो. ठाणे), पोलिस निरीक्षक सुनिल दशरथ महाडीक (प्रभारी, अधिकारी फलटण ग्रामीण पो.ठाणे), पोलिस निरीक्षक संदीप विलासराव जगताप (प्रभारी, अधिकारी सायबर पो.ठाणे), पोलिस निरीक्षक सुनिल सिताराम शेळके (प्रभारी, अधिकारी फलटण शहर पो. ठाणे), पोलिस निरीक्षक महेश किसन इंगळे (प्रभारी, अधिकारी जिल्हा विशेष शाखा, सातारा), मपोनि / श्रीसुंदर वंदना रजनीकांत (प्रभारी, अधिकारी खंडाळा पो. ठाणे)
कराडला आज एक कप चहाचा
कराडचे तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांची बदली होवून डीवायसएपी पदोन्नती झाल्याने त्यांनी निरोपाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. केवळ लोकांना भेटता यावे, यासाठी एक कप चहाचा घेण्यासाठी आमंत्रित केले असून पाच मिनिटे भेटता यावे, असा हा उद्देश आहे. आज गुरूवारी (दि. ६) सायंकाळी ६ वाजता प्रशासकीय इमारती समोरील डेक्कन भक्ती, शनिवार पेठ या निवासस्थानी एक कप चहाचा कार्यक्रम होणार आहे.