न्यूज अरेना इंडिया सर्व्हे : साताऱ्यातून काॅंग्रेस, शिवसेना हद्दपार तर राष्ट्रवादीचा बालेकिल्ला
सातारा | विशाल वामनराव पाटील
न्यूज अरेना इंडिया या संस्थेने केलेल्या सर्व्हे वरून राज्यात सरकारमधील पक्षात राजकीय वातावरण तापलेलं पहायला मिळत आहेच. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील सर्व्हेतही अनेक धक्कादायक निकाल दाखवलेले आहेत. प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातील सर्व्हेत पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष जयकुमार गोरे, आमदार महेश शिंदेना पराभवाचा सामना करावा लागणार असल्याचे म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यातील 8 विधानसभा मतदार संघात सध्या कराड दक्षिण हा एकमेव काॅंग्रेसचा मतदार संघ आहे. तर राष्ट्रवादीकडे कराड उत्तर, वाई आणि फलटण मतदार संघ आहे. भाजपकडे सातारा आणि माण- खटाव असून शिवसेना (शिंदे गटाकडे) पाटण, कोरेगाव मतदार संघ आहे. सध्याचे चित्र असे असताना आगामी निवडणुकीत न्यूज अरेना इंडिया या संस्थेने जाहीर केलेल्या सर्व्हेनुसार सातारा जिल्ह्यातून शिवसेना व काॅंग्रेस हद्दपार होईल. तर राष्ट्रवादी पुन्हा 6 ठिकाणी विजय मिळवत आपला बालेकिल्ला असल्याचे सिध्द करेल. त्यासोबत भाजपही 2 जागा मिळवेल असे म्हटले आहे.
सातारा जिल्ह्यात प्रामुख्याने न्यूज अरेना इंडियाच्या सर्व्हेनुसार शिवसेना (शिंदे गटाचे) राज्यातील वजनदार नेते उत्पादन शुल्क मंत्री व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचे विश्वासू असणाऱ्या शंभूराज देसाई यांचा पराभव होणार असल्याचे म्हटले आहे. तर दुसरीकडे कराड दक्षिणमध्येही भाजपाला यश मिळणार असून माजी मुख्यमंत्री व विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव होईल असा सर्व्हे केला आहे. दुसरीकडे कोरेगाव मतदार संघात महेश शिंदे यांचा आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष, तीनवेळा आमदार राहिलेले जयकुमार गोरे यांचाही माण- खटाव मतदार संघातून पराभव होणार असल्याचे सर्व्हेमध्ये दाखवले आहे. या सर्व्हेमुळे आता सातारा जिल्ह्यात मात्र काय राजकीय प्रतिक्रिया येतातयत, हे पाहणे गरजेचे आहे.
Pune/ Desh Region (58 seats) –
BJP : 22-23
SS : 1
NCP : 23
INC : 9-10
SSUBT : 1
OTH : 1Kolhapur – BJP :2-3, SS : 1, NCP : 4, INC : 2-3
271. Chandgad : NCP
272. Radhanagari : NCP
273. Kagal : NCP
274. Kolhapur South : 50:50
275. Karvir : INC
276. Kolhapur North : SS
277.…— News Arena India (@NewsArenaIndia) June 17, 2023
सातारा (Satara) – भाजप : 2. राष्ट्रवादी काँग्रेस : 6
255. फलटण (Phaltan-SC) : राष्ट्रवादी काँग्रेस
256. वाई (Wai) : राष्ट्रवादी काँग्रेस
257. कोरेगाव (Koregaon) : राष्ट्रवादी काँग्रेस
258. माण (Man) : राष्ट्रवादी काँग्रेस
259. कराड उत्तर (Karad North) : राष्ट्रवादी काँग्रेस
260. कराड दक्षिण (Karad South) : भाजप
261. पाटण (Patan) : राष्ट्रवादी काँग्रेस
262. सातारा (Satara) : भाजप (बलाढ्य उमेदवार