गोटे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निर्मला तांबे यांची बिनविरोध निवड
कराड | गोटे (ता. कराड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी निर्मला राजेंद्र तांबे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. निवडणूक निरीक्षक म्हणून कृषी अधिकारी कोमल घोडके यांनी काम पाहिले.
सरपंच रईसा भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. यावेळी ग्रामविकास अधिकारी एस. के. मुल्ला, ताहेर आगा, माजी तंटामुक्ती अध्यक्ष अल्लाऊद्दीन देसाई, हाजी रजाक पटेल, माजी उपसरपंच अमित पाटील, आय्याज सय्यद, आसिफ शेख, माजी उपसरपंच सुधीर पवार, सदस्य बानुबी सय्यद, वरिदा शेख, नाैशादबी पटेल, कोमल लादे, साबीर मुल्ला, ताैफिक आगा, प्रविण शिंदे, गीता पुजारी आदी उपस्थित होते.
उपसरपंच सुधीर पवार यांनी राजीनामा दिल्याने गोटे ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद रिक्त झाले होते. या पदासाठी निर्मला राजेंद्र तांबे यांचा एकमेव अर्ज दाखल होवून छाननीमध्ये वैध ठरला होता. त्यामुळे निर्मला तांबे यांची बिनविरोध निवडूण आल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडीनंतर गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला.