ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रप्रशासनराजकियराज्यसातारासामाजिक

व्यावसायिकांचा रस्ता रुंदीकरणाला विरोध : पेयजल योजनेवरून मसूरची ग्रामसभा गाजली

मसूर प्रतिनिधी गजानन गिरी
कराड – मसूर, मसूर – उंब्रज रस्त्याच्या रुंदीकरणामुळे घरासह व्यावसायिकांचे नुकसान, पेयजल योजनेच्या कामात निष्काळजी व वेळकाढूपणामुळे ग्रामस्थ त्रस्त, खाजगी रुग्णालयात रुग्णाकडून पैशाची लूट आदी विषयाने मसूरची ग्रामसभा चांगलीच चर्चेत आली. अंगणवाडी सेविकांच्या न्यायासाठी करण्यात येत असलेल्या संघर्षात ग्रामसभेत पाठिंबाही देण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच पंकज दीक्षित होते. माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, उपसरपंच विजयसिंह जगदाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ मैथिली मिरजे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नरेश माने, प्रा कादर पिरजादे, माजी सरपंच दिनकरराव शिरतोडे व प्रकाश माळी ग्रामपंचायत सदस्य संग्रामसिंह जगदाळे, प्रमोद चव्हाण, कैलास कारणे, सौ निलोफर मोमीन, वैशाली पाटोळे, सौ पुजा साळुंखे, ऍड रणजीतसिंह जगदाळे, अंगणवाडी सेविकासह आशा वर्कर्स व ग्रामस्थ उपस्थित होते.

कराड मसूर रस्त्याचे रुंदीकरण 80 फुटावर न करता 60 फुटावर करण्यात यावे. पुसेसावळी, पुसेगाव, कोरेगाव, कोपर्डे हवेली गावाप्रमाणेच रुंदीकरण करण्यात यावे. रस्त्याच्या कामात या गावाप्रमाणेच शिथिलता द्यावी. नागरी हद्दीतील घरांचे व व्यवसायिकांचे नुकसान करण्यात येऊ नये. नागरिक क्षेत्रात गटारावरील हद्द कायम करावी.चौपदरीकरणाला विरोध नाही मात्र नुकसान न होता रुंदीकरणाचे काम हाती घ्यावे. यानुसार रस्त्याच्या रुंदीकरणाला ग्रामसभेत विरोध दर्शवला गेला. याप्रकरणी ठराव संमत करीत ग्रामपंचायतीने जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करावा. याबाबत ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.

मसूरमध्ये अधिकारी व ठेकेदाराच्या मनमानी व दुर्लक्षितपणामुळे कासवाच्यागतीने पेयजल योजनेचे काम सुरू आहे. रस्ता खुदाईमुळे रस्त्याची दुर्दशा मोठ्याप्रमाणात झाली आहे. याबाबत ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेयजल समितीची अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराची ठरल्यानुसार मीटिंग घेण्यात आली नाही. यावर जोरदार चर्चा झाली. पेयजल समिती फक्त नावालाच आहे का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावर रस्ता दुरुस्ती व गावात मोठ्या दाबाने पाणी आल्याशिवाय योजना ताब्यात घेणार नसल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले.

सध्या मसूरमध्ये खाजगी रुग्णालयात उपचार करताना आर्थिक लूट सुरू आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या तक्रारी वाढल्या आहेत. किरकोळ बाबीला सलाईन लावणे व आवश्यकता नसताना रुग्ण ऍडमिट करून उपचार करणे सुरू आहे. याबाबत दखल घ्यावी. मसूरमधील सर्व दवाखान्यांचे नर्सिंग ऍक्ट नुसार रजिस्टर झाल्याची खात्री प्राथमिक आरोग्य केंद्राने करावी. ज्या कुटुंबाची रेशनकार्ड आहेत मात्र धान्य मिळत नाही त्यांनी ग्रामपंचायतीचा ठराव घ्यावा. याबाबत सभेत चर्चा झाली. 35 ग्रामस्थांना धान्य मिळण्याबाबत ग्रामपंचायतीने ठराव दिले आहेत. नरेगात किती विहिरींची प्रकरणे झाली या प्रश्नावर एकही प्रस्ताव आले नसल्याचे ग्रामपंचायतीच्यावतीने सांगण्यात आले.
शितोळे व बर्गे वस्तीवर वीज आणण्यात आमदार बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नानुसार मसूर ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन पाठपुरावा केल्याबद्दल वामनराव शिरतोडे यांनी अभिनंदन केले. इतर समाजाला धक्का न लागता 50% आरक्षण मिळावे असा ठराव घ्यावा अशी मागणी करण्यात आली. मसूरमधील अंगणवाडी सेविकांनी सोमवार 4 तारखेपासून काम बंद आंदोलन करणार असल्याचे लेखी निवेदन ग्रामसभेत दिले. प्रारंभी ग्रामसेवक गणेश गोंदकर यांनी मागील सभेचे अहवाल वाचन केले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker