स्वातंत्र्य दिनानिमित्त छ. उदयनराजे यांच्या हस्ते उद्या मसूरला ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान
![Udayanaraje](https://hellonews.co.in/wp-content/uploads/2023/08/hellonewskrd-2023-08-14T213026.899-780x450.jpg)
मसूर प्रतिनिधी | गजानन गिरी
स्वातंत्र्यदिनी 75 वर्ष पूर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सन्मानपूर्वक मसूर येथे सिद्धेश मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. सातारा विकास अभियानांतर्गत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली कराड उत्तरचे युवा नेते कुलदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली हा सन्मान सोहळा होत आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. भारताने विविध क्षेत्रात आपला आगळा दबदबा निर्माण करून आज जगातील पहिल्या पाच नामांकित देशांमध्ये स्थान निर्माण केले आहे. खऱ्या अर्थाने याचे श्रेय स्वातंत्र्या संग्रामात ज्या पिढीने प्रयत्नांची पराकष्ठा केली, ती पिढी म्हणजे ज्यांचे वय 75 वर्ष पूर्ण झालेले आहे. अशा सर्व जेष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
सातारा विकास अभियानामध्ये युवती व महिलांना गावोगावी विविध प्रशिक्षण, मुलींच्या समुपदेशन कार्यशाळा, सुशिक्षित बेरोजगारांचा नोकरी महोत्सव, महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ मिळावी यासाठी प्रदर्शन व विक्री, महिला बचतगट फेडरेशन, गुणवंतांचा गौरव, महिलांना दुचाकी व चारचाकी वाहन प्रशिक्षण असे उपक्रम मोफत राबविण्यात येणार आहेत. सर्व उपक्रमांच्या माहितीसाठी इच्छुकांनी सातारा विकास अभियान भूमी प्लाझा. मसूर – कराड रोड सिद्धेश मंगल कार्यालाजवळ दुसरा मजला या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन संयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.