सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात 11 गावात ‘एक गाव, एक गणपती’ : हद्दपारीच्या 23 जणांना नोटीसा
म्हसवड | गणेशउत्सव व ईद ए मिलाद हे हिंदू- मुस्लिम बांधवांचे सण एकत्रित आल्याने म्हसवड पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील 42 गावांत सुव्यवस्था राखण्यासाठी 23 जणांना हदपारीच्या नोटिसा बजावल्याची माहिती सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी पत्रकारांना दिली. म्हसवड पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात समावेश असलेल्या 42 गावात यंदा एकूण 144 सार्वजनिक गणेश मंडळे गणेशमूर्तीची स्थापना करून उत्सव सूचना साजरा करीत आहेत. यामध्ये 11 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम ग्रामस्थांनी राबवला आहे. म्हसवड शहरात 23 मंडळांनी यंदाच्या उत्सवात आहे. भाग घेतला
उत्सव व ईदच्या कालावधीसाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस व गृहरक्षक दल, सायंकाळी रात्री, पहाटे व सकाळच्या सुमारासही पोलिसांची गस्त सुरू केली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होणारे आक्षेपार्ह वादग्रस्त आणि विडंबनात्मक देखाव्याचे सादरीकरण करू नये. समाज प्रबोधनात्मक देखाव्यांवर मंडळांनी भर द्यावा. विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवावेत. विद्युत रोषणाई करताना शॉर्टसर्किटच्या घटना टाळाव्यात. याबरोबरच ‘श्रीं च्या मूर्तीचे विसर्जन मिरवणुकीत ध्वनिक्षेपकाची मर्यादा पाळणे गरजेचे असल्याच्या सार्वजनिक मंडळांना देण्यात आलेल्या आहेत. विसर्जन मिरवणुकीत दोन मंडळांत अडथळा वादविवाद होता कामा नये, असेही भुजबळ यांनी सांगितले.
गणेशोत्सव काळात सर्व मंडळांनी मद्यपान करून रात्री- अपरात्री मोठ्याने कर्कश आवाजात गाणी लावून लहान मुले, वयोवृद्ध व आजारी रुग्णांस त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही श्री. भुजबळ यांनी केले. यावेळी म्हसवड पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.