तांबवेत शुक्रवारी ओपन बैलगाडा शर्यती : प्रथम क्रमांकास बोकड बक्षीस

कराड | तांबवे (ता. कराड) येथील श्री. तांबजाई देवी व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. 24 मार्च) सकाळी 9.30 या शर्यती होणार आहेत. यासाठी रोख रक्कम, आकर्षक चषक व मानाची ढाली व त्यासोबत प्रथम क्रमांकास बोकड बक्षीस देण्यात येणार आहे.
तांबवे- पाठरवाडी भैरवनाथ देवाची यात्रा 24 मार्च रोजी होणार आहे. या दिवशी बैलगाडा शर्यती होणार असून त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम 25 व 26 मार्च रोजी होणार आहेत. बैलगाडा शर्यतीसाठी 1 हजार रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून ओपन मैदान होणार आहे. बैलगाडा शर्यतीत जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील यांच्या वतीने 66, 666 हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस, द्वितीय क्रमांकाचे 55,555 बक्षीस युवा नेते सुनील बामणे यांच्या वतीने तर तृतीय क्रमांकांचे बक्षीस 44, 444, चतुर्थ क्रमांकांचे बक्षीस 33, 333, पाचव्या क्रमाकांचे बक्षीस 22,222 तर सहाव्या क्रमाकांच्या विजेत्यास 11,111 बक्षीस देण्यात येणार आहे. या शर्यतीमध्ये गावातील बैल गाड्यांचा पळविल्या जाणार नाहीत.
शनिवार व रविवार देवाची यात्रा
श्री. तांबजाई व महादेव देवाच्या यात्रेनिमित्त शनिवार दि. 25 रोजी सकाळी 7 वाजता कै. पोपट यादव यांच्या मानाच्या सासन काठीचे तांबजाई मंदिराकडे प्रस्थान होईल. रात्री 9 वाजता बारामती येथील आॅर्केस्टा होईल. दि. 26 रोजी रविवारी श्री चा छबिना सकाळी 6 वाजता निघणार आहे. रविवारी लोकनाट्य तमाशा होणार असल्याचे यात्रा कमिटीने सांगितले आहे.