कराड उत्तरचे भाजपा नेते मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन
कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी
कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे युवा नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मनोजदादा घोरपडे यांचा वाढदिवस शुक्रवार (दि. 26 ‘मे’) रोजी साजरा होत आहे. या वाढदिवसानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान या वाढदिवसाचे औचित्य साधून कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात विविध समोजपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. भाजपा नेते तथा खटाव- माण साखर कारखान्याचे को- चेअरमन मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि. 22) नागठाणे येथे भव्य नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिर एच.व्ही. देसाई आय हाॅस्पिटल हडपसर पुणे आणि मनोजदादा घोरपडे युवा मंच कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन हनुमान मंदिर चौक नागठाणे येथे सकाळी 9 वाजता अजिंक्यतारा कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड. विक्रम पवार तर प्रमुख अतिथी बोरगाव पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र तेलतुंबडे उपस्थित राहणार आहेत. मंगळवारी (दि.23) मसूर येथे सकाळी 9 वाजता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी (दि. 24) रहिमतपूर येथे सकाळी 9 वाजता मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवारी सायंकाळी 6 वाजता मत्यापूर येथे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे दमदार नेतृत्व मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला- भगिनींसाठी खास होम मिनिस्टर कार्यक्रम खेळ पैठणीचा, खेळ मनोरंजनाचा….! आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम पंचक्रोशी शिक्षण मंडळ रहिमतपूरचे अध्यक्ष सौ. चित्रलेखाताई माने- कदम, तेजस्विनी महिला विकास सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा सौ. संगीता शिंदे तसेच बोरगाव पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ होणार आहे. या कार्यक्रमाच्या या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मंगलताई घोरपडे व सौ. विजया गुरव या उपस्थित राहणार आहेत. होम मिनिस्टर प्रस्तुत दीपक साबळे या कार्यक्रमाचे नेटके संयोजन करणार आहेत. या कार्यक्रमास सर्व महिला भगिनींनी उपस्थित रहावे असे आव्हान संयोजक सौ. समता घोरपडे सौ. तेजस्विनी घोरपडे, सौ. रिना घोरपडे व आयोजक मनोजदादा घोरपडे युवा मंच महिला आघाडी कराड उत्तर यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अभिनेत्री दिपाली सय्यद व भार्गवी चिरमुले उपस्थित राहणार असून या कार्यक्रमात बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे.
किवळ (ता. कराड) येथे (दि. 25) गुरुवारी सकाळी 10 वाजता बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिनी (दि. 26) सकाळी 9 वाजता पाली गावचे आराध्य श्री. खंडोबा देवाचा अभिषेक व बांधकाम कामगार आरोग्य शिबिर आयोजक योगेश्वर सामाजिक संस्था पाल व पाल ग्रामस्थांच्यावतीने आरोग्य शिबिराचे सकाळी 10 वाजता आयोजन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त मनोज घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी विधायक उपक्रम कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार असल्याचे अमोल पवार यांनी सांगितले.