कोटा अकॅडमीचे 4 विद्यार्थी JEE ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र

कराड । नुकताच जेईई मेन्स या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कराड येथील कोटा अकॅडमी मधील 4 विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. कु. दमयंती पाटील, कु. सौदा वाईकर, कुमार जिवा कांबळे, कु. ऐश्वर्या काशीद हे विद्यार्थी जेईई ऍडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत . तसेच कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स मध्ये इयत्ता नववी व अकरावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये इयत्ता 9 वी मध्ये कु. रिया निलेश थोरात या विद्यार्थिनीने 95.33% तर 11 वी मध्ये कु. दिया हितेश पटेल या विद्यार्थिनीने 96% गुण प्राप्त करून अव्वल येण्याचा मान मिळविला आहे.
यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचा कोटा अकॅडमी व कोटा ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स कराडचे संचालक डॉ. महेश खुस्पे सरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अकॅडमीच्या संचालिका सौ. मंजिरी खुस्पे, कु. मैथिली खुस्पे, प्राचार्या सौ. जयश्री पवार, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. सन 2006 पासून कराड येथे कोटा अकॅडमी कार्यरत असून गेल्या 18 वर्षांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी आयआयटी -जेईई ,नीट, एमएच -सीइटी, एनडीए यासारख्या परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे.
कोटा अकॅडमी मध्ये इयत्ता 8 वी, 9 वी 10 वी या वर्गांची फाउंडेशन पासूनची तयारी करून घेतली जाते. त्यामुळे इयत्ता आठवी पासूनच मुलांना आयआयटी -जेईई -नीट- एमएचटी -सीईटी, एनडीए यासारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी होते. इयत्ता 8 वी ते 12 वी या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. उद्या 5 मे पासून इयत्ता 8 वी ते 10 वी या वर्गाची फाउंडेशनची बॅच चालू होणार असून अकरावीची सुद्धा प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना कोटा अकॅडमी मध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे. त्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करून घ्यावा, असे आवाहन कोटा अकॅडमीचे संचालक डॉ. महेश खुस्पे सरांनी केले आहे.