पाटणच्या मळाईदेवी दूध संस्थेच्या निवडणुकीत पाटणकर गटाची सत्ता अबाधित
पाटण | विशाल वामनराव पाटील
केर (ता. पाटण) श्री. मळाईदेवी सहकरी दुध उत्पादक संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत राष्ट्रवादी काँगेस पार्टी पुरस्कृत श्री. जानाईदेवी विकास पॅनलने 7-1 अशा फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाच्या पॅनेलचा पराभव झाला. तर पाटणकर गटाने आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले.
राष्ट्रवादी पुरस्कृत श्री जानाईदेवी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे ः-
सर्वसाधारण गटातून- गुलाब आण्णा यादव, गंगाराम गणपती यादव, दाजी हरी यादव, संभाजी जोती यादव. महिला राखीव गटातून ः- कमल दगडू साळुंखे, अनु/जाती/जमाती प्रवर्गातून- तानाजी तुकाराम बोलके तर इतर मागास प्रवर्गातून ः- गोविंद धुळा जाधव यांची बिनविरोध निवड झाली होती. विरोधी शिवसेना शिंदे गटाच्या श्री जानाई देवी ग्रामविकास पॅनेलमधून वच्छलाबाई ज्ञानू यादव या एकमेव महिला राखीव गटातून उमेदवार विजयी झाल्या.
केर येथे विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादीचे युवानेते, सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी विजयी उमेदवारांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.