वस्ती साकुर्डी जिल्हा परिषद शाळेत 100 वृक्षांचे रोपण

विशाल वामनराव पाटील
विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास हा जिल्हा परिषदेच्या शाळेत होत असतो, त्यामुळे वस्ती साकुर्डीची शाळा सर्वसोयींनी करण्याचा मानस आम्ही बाळगून आहोत. आता शिक्षकांनी गुणवत्ता वाढवून शाळेचे आणि वस्ती साकुर्डी गावचे नाव उंचवावे, अशी अपेक्षा उपसरपंच विश्वास कणसे यांनी व्यक्त केली. वस्ती साकुर्डी (ता. कराड) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत 100 वृक्षाचे रोपण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
या वृक्षारोपण कार्यक्रमास कृषी मंडल अधिकारी सुंशात भोसले, कृषी पर्यवेक्षक अशोक कोळेकर, सरपंच काशिनाथ जाधव, ग्रामसेवक वर्षा पवार, माजी सैनिक कृष्णत केंजळे, रेणूका जाधव, ग्रामपंचायत सदस्य सुभाष निकम, दशरथ ढगाले, प्रतिभा केंजळे, वैभव कणसे, शुभम कांबळे, हणमंत देशमुख, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुर्यकांत कणसे, शाळेच्या मुख्याध्यापिका उज्वला पाटील, संगिता बैले, वैशाली माने, शैला जाधव, वि. ग. माने हायस्कूलचे अनिल काटकर, एस. एस. पाटील, जाधव सर व ग्रामस्थ उपस्थित होते.
वस्ती साकुर्डी जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नविन इमारतीच्या परिसरात फुले, फळे यांची वृक्षांचे रोपण लावण्यात आली आहेत. वृक्षारोपणासाठी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ आणि वसंतगडच्या वि. ग. माने हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.