विद्यार्थींनीची छेड काढणाऱ्या चार अल्पवयीन मुलांच्या विरोधात पोलिसांत तक्रार

कराड | तालुक्यातील एका शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या चौघा विद्यार्थ्यांनी त्याच शाळेतील दहावीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थिनीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधित मुलीच्या तक्रारीवरून कराड तालुका पोलीस ठाण्यात घटनेची नोंद स्टेशन डायरीला करण्यात आली आहे. तसेच अल्पवयीन असल्याने संबंधित मुलांना सातारा येथील बाल न्याय मंडळ येथे समोपदेशनकामी भेटविले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
तक्रारदार अल्पवयीन मुलगी ही एका शाळेत दहावी मध्ये शिक्षण घेत आहे. दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता संबंधित मुलगी व तिची मैत्री शाळेसमोरून जात असताना त्याच शाळेतील नववी मध्ये शिकणाऱ्या चार अल्पवयीन मुलांनी छेड काढली. त्यानंतर या घटनेची माहिती संबंधित मुलीने शिक्षक सचिन नलवडे यांना दिले होती. तसेच हा प्रकार शिक्षक नलवडे यांनीही स्वतः पाहिला होता. हा प्रकार घडण्यापूर्वी मागील महिन्यात संबंधित मुलांनी शाळेतून घरी जात असताना पाठीमागून येत जोरजोरात संबंधित मुलीची छेड काढली होती. हा प्रकारही संबंधित मुलीने शिक्षक सचिन नलवडे यांना सांगितला होता असे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ज्या मुलांविरोधात तक्रार करण्यात आली आहे ती सर्व मुले अल्पवयीन आहेत. संबंधित गुन्हा साध्या प्रकारातील असून त्या सात वर्षापेक्षा कमी शिक्षा आहे. महाराष्ट्र राज्य बाल न्याय अधिनियम 2018 अन्वये या प्रकरणी गुन्हा दाखल न करता स्टेशन डायरी नोंद घेऊन संबंधित मुलांना समोपदेशनसाठी सातारा येथील बालन्याय मंडळात पाठवले जाणार असल्याची माहिती तालुका पोलिसांनी दिली आहे.