राजकारण तापलं : पाटणला बाजार समिती निवडणूकीसाठी मंगळवारी बैठक

कराड प्रतिनिधी | विशाल वामनराव पाटील
पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक मंगळवार दिनांक २८ मार्च रोजी दु.1.30 वा, श्रीमंत रणजितसिंह पाटणकर स्मारक, पाटण (भाजी मंडई शेजारी) येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्यामुळे आता पाटण तालुक्यातील बाजार समितीचे राजकारणास सुरूवात झाल्याचे पहायला मिळत आहे.
या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री विक्रमसिंहजी पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली व पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होणार आहे.
तरी या बैठकीस पक्षाचे सर्व पदाधिकारी, सर्व संस्थाचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी/माजी जि.प./ प.स.सदस्य, सर्व सोसायटीचे चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी व सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शेलारांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी केले आहे.