ताज्या बातम्यापश्चिम महाराष्ट्रराज्यसांगलीसातारासामाजिक

छत्रपतींचा आदर्श घेऊन कार्य करा : ला. भावना शाह यांचा संदेश

लायन्स क्लब ऑफ कराड मेन या नूतन क्लबच्या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण

कराड | विशाल वामनराव पाटील
आपण घेणाऱ्या प्रत्येक श्वासाचे कर्ज आपल्याला फेडायचे आहे. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे उत्तुंग कार्य आयुष्यात केले पाहिजे. त्यांच्या नीतिमूल्यांना जपत लायन्स क्लबचे काम करा, असा संदेश मुंबईहून आलेल्या लायन भावना शाह यांनी समस्त कराडच्या लायन परिवाराला दिला. यावेळी लायन्स क्लब ऑफ कराड मेनच्या अध्यक्ष पदाची शपथ खंडू इंगळे यांना देण्यात आली. तसेच सचिवपदी संदीप पवार खजिनदारपदी जयंत पालकर यांचेसह संचालक मंडळानीही शपथ घेतली.

यावेळी उद्घाटक डिस्ट्रिक्ट 3234 D 1 चे प्रांतपाल ला.भोजराज नाईक निंबाळकर, नविन सदस्य शपथविधी अधिकारी ला. धैर्यशील भोसले, रिजन चेअरमन बाळासाहेब शिरकांडे, झोन चेअरमन बाळासाहेब महामुलकर, डिस्ट्रिक्ट कॅबिनेट ॲडमिनिस्ट्रेटर मंगेश दोषी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी राजीव नाईक निंबाळकर, लायन्स क्लब ऑफ सातारा कॅम्पच्या अध्यक्षा डॉ.भाग्यश्री शिंदे, लायन्स क्लब ऑफ सातारा एमआयडीसीच्या ला. वृषाली गायकवाड, माजी प्रांतपाल ला. पांडुरंग शिंदे, माजी प्रांतपाल प्रभाकर आंबेकर, माजी प्रांतपाल सुनील सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती. कराड येथील पंकज हॉटेल येथे पार पडलेल्या या सोहळ्यास सातारा सांगलीसह अनेक भागातून लायन सदस्य उपस्थित होते. तसेच कराड रोटरी क्लब, व इनर्व्हीलचे सदस्य देखील या सोहळ्यास उपस्थित होते.

भावना शाह यांनी लायन सदस्यांना शपथ देताना छत्रपती शिवाजी महाराजांची नितीमुल्ये विषद करत छत्रपतींजवळ असणाऱ्या प्रत्येक वस्तू आणि गोष्टींचा त्यांच्या कार्याशी कसा संबंध होता हे सांगितले. लायनच्या नुतन पदाधिकाऱ्यांना आगळ्या- वेगळ्या पद्धतीने शपथ दिली व त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करा, असा संदेशही दिला
यावेळी खंडू इंगळे म्हणाले, ज्याप्रमाणे शाह मॅडमनी छत्रपतींच्या नितुमूल्याप्रमाणे कराड मेन लायन्स क्लबकडून कार्याची अपेक्षा केली आहे त्या पद्धतीने काम करण्याचा नक्कीच आम्ही सगळे प्रयत्न करू. समाजोपयोगी अनेक नवनवीन उपक्रम मोठ्या पद्धतीने राबवण्यात आम्ही लायन्सच्या माध्यमातून कुठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.

यावेळी डिस्ट्रिक्ट स्केस्ट चेअरमन सुहास निकम, कॅबिनेट ऑफिसर प्रा.बी.एस सावंत, ला.मनोज देशमुख, ला.गौरी चव्हाण, ला. विद्या मोरे, झोन चेअरमन रविकिरण गायकवाड, ला.ॲड.विजय जमदग्नी, रिजन सेक्रेटरी अनिल कदम, झोन चेअरमन अमितराज शेटे, लायन्स क्लब ऑफ कराड नक्षच्या अध्यक्षा ला.डॉ.अनघा राजगुरू, लायन्स क्लब ऑफ सातारा अजिंक्यचे अध्यक्ष रामदास कदम, लायन्स क्लब ऑफ सातारा गेंडामाळचे अध्यक्ष अग्नेश शिंदे, मसूर क्लबचे रमेश जाधव, सदाशिव रामुगडे, डॉ.लोखंडे व रिजनमधील बहुसंख्य क्लबचे सदस्य उपस्थित होते. सुत्रसंचलन ला.सचिन पाटील, ला.सुधीर पाटील, ला.शिवाजीराव फडतरे यांनी तर आभार ला. वैशाली निकम यांनी मानले.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker