हत्येचा निषेध : फलटणला जैन समाजाचा मुक मोर्चा

फलटण | आचार्य श्री 108 कामकुमारनंदजी महाराज यांची झालेल्या निर्घुण हत्येबाबाबत सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून फलटण बंद ठेवत शहरातून मोर्चा काढत तहसीलदार फलटण यांना निवेदन देण्यात आले. बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील आचार्य श्री कमकुमार नंदजी महाराज यांची हत्या काही दिवसापूर्वी झाली. पोलिस जैन साधू कमकुमार नंदजी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध घेत असून या हत्येने देशात सर्वत्र ठरले खळबळ माजली आहे. सर्वत्र याचा निषेध करण्यात येत आहे. फलटण येथेही मोठ्या संख्येने जैन समाज बांधव उपस्थित होते.
या निवेदनात असे म्हंटले आहे की, दि. 05/07/2023 राज्यामध्ये दिगंबर जैन साधु आचार्य श्री 108 कामकुमार नंदन निर्घुण हत्या करण्यात आली. या समाज विघातक कृत्याचा सकल जैन समाजाने फलटण बंद ठेवून मोर्चा द्वारे निषेध नोंदवला. जैन साधु हे असा तत्वाचे पालन करणारे असतात. कधीही कुणावर हल्ला करत नाही किंवा छोट्या जीवाची सुचा हिंसा करत नसतात. आपल्या प्रवचनामधुन राष्ट्र उभारणी, राष्ट्रप्रेम, व्यवसन मुक्ती, शाकाहार अभोदन करून समाज जागृती करीत असतात. जैन साधू 24 तासातून एकदाच अन्न जलचा स्विकार करत असतात. अशा धर्मगुरूची हत्या ही अत्यंत निंदणीय घटना असून या घटने मागचा सुत्रधार पकडला गेला पाहीजे. आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा फास्ट ट्रैक कोर्टामध्ये खटला चालवून झालीच पाहीजे. वास्तविक पहाता झालेल्या घटनेचे गांभीर्य पाहून भारतामध्ये अल्प संख्यांक असलेल्या जैन समाजाला जैन समाजाच्या ट्रस्ट, जैन समाजाच्या देवस्थानांना व जैन धर्मगुरूना कायदेशीर मार्गाने पोलीस संरक्षण केंद्र व राज्य सरकारच्या वतीने उपलब्ध करण्याची विनंती करित आहोत.
जैन धर्मगुरू पायी विहार करत असताना त्यांना रस्त्यामध्ये असणाऱ्या शाळा या वास्तव्यासाठी उपलब्ध करून देण्या संदर्भात शिक्षण खात्याकडून नियमात सुधार करण्यात यावा. जैन धर्मगुरु पायी विहार करत असताना सध्या काही समाज घटकांनकडून जैन गुरूवर प्राणघातक हल्ला करण्यात येत असून गत 5 वर्षामध्ये हजारो धर्मगुरू याचे बळी पडले आहेत. त्यामुळे धर्मगुरूंचा विहार होत असताना प्रत्येक गावाच्या हद्दी पासून ते दुसऱ्या गावाच्या हद्दीपर्यंत पोलीस संरक्षण मिळावे. जैन अनुयायी हे धर्माप्रती अत्यंत श्रद्धा असल्याने देशात मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी व संस्था उभी करण्याची कामे सुरू आहेत. या सर्व मंदीरांना व संस्थांना कायमस्वरूपी पोलीस संरक्षण उपलब्ध होणे आवश्यक आहे.
सदर झालेली घटना ही घृणास्पद तर आहेच, पण ती अत्यंत नियोजन पद्धतीने झाली असल्याने या कटात सामील सर्वच्या सर्व आरोपी पकडले जात नाही. तोपर्यंत घडलेल्या ठिकाणी पोलीस संरक्षण उपलब्ध व्हावे. सदर कटातील आरोपी हे कर्नाटक सह इतर राज्यातील असल्याच्या बाबत विविध माध्यमातून समजत असल्याने हा तपास कर्नाटक पोलीसांकडून काढून घेवून सीबीआयकडे देण्यात यावा, असे सकल जैन समाज, फलटण यांच्याकडून निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे. सदर निवेदनावर जैन सोशल ग्रुप, अध्यक्ष डॉ. सूर्यकांत शांतीलाल दोशी, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक समिती अनुप रमणलाल शहा, सुमित अरविंद दोशी, यशराज प्रदीप गांधी यांच्या सही आहेत.