अभिमानास्पद : कोळेत PSI आकाशी चव्हाण हिचा नागरी सत्कार
कराड । स्वप्न पहायला आजोबानी शिकवले. तळहातावरच्या फोडाप्रमाणे आजीने जपले. पंखात स्वप्न पहायचे बळ अणि झेपावयला आकाश मला माझ्या आई-वडीलानी दिले. मुलीच्या शिक्षणासाठी कष्टाचे रान त्यांनी केले. माझ्या यशात प्रत्येक व्यक्तीचे योगदान लाखमोलाचे असून माझे सर्व यश त्या सर्वाच्या चरणासी मी अर्पण करते. परंतु, आजच्या सत्कार, मिरवणूकीच्या कार्यक्रमाचे सार्थक हे प्रेरणा घेवून कोणतीरी गावात अजून एखादा अधिकारी होईल, असे प्रतिपादन पीएसआय आकाशी चव्हाण हिने सत्काराला उत्तर देताना केले.
पोलीस उपनिरिक्षक पदाचे प्रशिक्षण पुर्ण केल्यानंतर गावी आलेल्या आकाशी चव्हाण हिचे स्वागत सवाद्य गावातून मिरवणुकीने अणि कौतुक नागरी सत्काराने कोळे ग्रामस्थांनी केले. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना चव्हाण बोलत होती. महिला काॅग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस व रयतच्या संचालिका विजयाताई माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. माजी जिल्हा परिषद सदस्य शंकरराव खबाले, घाडगेनाथ पतसंस्थेचे संस्थापक राजेंद्र चव्हाण, सरपंच भाग्यश्री देसाई, उपसरपंच सुधीर कांबळे,वैधकीय अधिकारी डाॅ. प्रकाश कदम, जयश्री पाटील, अरूण यादव, दिपक महाडीक, अशोक घाडगे, एकनाथ फिरंगे यासह विभागातील नागरीक याप्रसंगी उपस्थीत होते.
PSI आकाशीची आई पात्र पदवीधर शिक्षिका श्रीमती शोभाताई चव्हाण, बहिण एमटेक झालेल्या पूनम चव्हाण, डाॅक्टरकीची पदवी मिळविल्याने डाॅ. तेजस्वीनी चव्हाण, भाऊ बायो मेडिकल इंजिनिअर शंभूराज चव्हाण यांचाही यावेळी सत्कार याप्रसंगी कोळे ग्रामस्थांनी केले. आकाशी चव्हाण हिच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मनोगतातून व्यक्त केले. पीएसआय पदानंतर पुढील आणखी टप्पे पुर्ण करण्यासाठी आवाहन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा यावेळी दिल्या. सुत्रसंचालन सचिन गुजर अणि विजय राऊत यांनी केले. संभाजी चव्हाण यांनी आभार मानले.